
Delcy Rodriguez & US
याच वेळी एक लीक झालेल्या ऑडिओने देखील या प्रकरणाला गंभीर वळण दिले आहे. या ऑडिओनुसार डेल्सी रॉड्रिग्ज यांनी दावा केला की, अमेरिकेन सैन्याने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाईची धमकी दिली होती. यावेळी त्यांनी केवळ १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या काळात त्यांना अमेरिकेच्या सर्व अटी मान्य करण्यास भाग पाडण्यात आले होते. अन्यथा त्यांची हत्या करण्यात आली असती. रॉड्रिग्ज यांच्या म्हमण्यानुसार, मादुरो यांना अटक केल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या आणि त्यांच्या भावावर जॉर्ज रॉड्रिग्ज आणि गृहमंत्री डिओसदाडो कॅबेलो यांना त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.
रॉड्रिग्जने असाही दावा केला की, अमेरिकन लष्कराने त्यांच्यावर मानिसकरित्या दबाव वाढवला होता. यासाठी त्यांनी निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांची हत्या करण्यात आली असल्याची खोटी बातमी त्यांना देण्यात आली. परंतु मादुरो यांना अटक करुन न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आले होते. मात्र अमेरिकन सैन्याने रॉड्रिग्ज यांना मादुरोच्या हत्येसाठी जबाबदार धरत अटी मान्य करण्यास भाग पाडले. यामुळे डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशात अराजकता निर्माण होऊ नये, सत्ता कोलमडू नये यासाठी अमेरिकेच्या अटी स्वीकारल्या.
परंतु हा ऑडिओ लीक झाल्यानंतर राजकीत तज्ज्ञांनी रॉड्रिग्ज यांच्यावर अमेरिकेशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रॉड्रिग्ज स्वत:ला अमेरिकेला बळी पडल्याचे दाखवत आहे, पण प्रत्यक्षात मादुरो यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी त्यांचाच हात आहे. कारण अंतर्गत सहकार्याशिवाय राष्ट्राध्यक्षांची अटक अशक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील रॉड्रिग्जचे कैतुक केल्याने त्यांच्यावरील संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. सध्या या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Filtran audio donde Delcy Rodríguez, hoy presidenta encargada de Venezuela, le confiesa a su gente que “EE.UU. nos dio a Jorge [Rodríguez, hermano de Delcy, presidente de la Asamblea Nacional], Diosdado [Cabello, ministro del Interior] y a mí, 15 minutos para responder si… pic.twitter.com/oB6hOFPko6 — José Luis Morales (@JLMNoticias) January 24, 2026
Madurao चे अपहरण की 5 बिलियन डॉलरची डील? Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट
Ans: डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावर मादुरो यांना सत्तेवरुन उतरवण्यासाठी अमेरिकन लष्कराशी गुप्त हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: डेल्सी रॉड्रिग्ज यांनी दावा केला की, अमेरिकेन सैन्याने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाईची धमकी देत अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास भाग पाडले होते.