व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट
Madurao चे अपहरण की 5 बिलियन डॉलरची डील? Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, केप टाऊनमध्ये अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील हस्तक्षेपाविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. यावेळी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro)आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरिसला अटक करण्यात आली होती. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईला दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी विरोध केला असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे.
या निदर्शनांमध्ये सामन्य जनता, विविध मानवाधिकार आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी यांसारख्या लोकांचा समावेश आहे. या निदर्शनांमध्ये हजारो लोक सहभागी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचा साम्राज्यवाद थांबवा, व्हेनेझुएला सोडून जा आणि मादुरोच्या सुटकेची मागणी केली जात आहे.
निदर्शकांच्या मते, अमेरिकेची कारवाईही आंतराराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. एकाद्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखांना जबरदस्तीने अटक करणे बेकायदेशीर आहे. तसेच अमेरिका दडपशाही परसवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप निदर्शकांनी केला आहे. त्यांच्या मते, आज व्हेनेझुएलावरील या कारवाईला विरोध न केल्यास उद्या दुसऱ्या कोणत्याही देशावर ते हल्ला करु शकतात. यामुळे याविरोधात एकजुट होणे अत्यंत गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेतील फार्मासिस्ट मायकेल टाइटस यांनी अमेरिका (America) जगभरात साम्राज्यवाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, याला आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करुन रोखता येऊ शकते. यामुळे सार्वभौम देशाचा आदर आणि सुरक्षा सुनिश्चित होईल. या निदर्शनांमध्ये अमेरिकेच्या व्हेनेझुएलाच्या तेलावरील नियंत्रणाला देखील तीव्र विरोध करण्यात आला आहे.
More than 100 demonstrators rallied outside the U.S. Consulate in Johannesburg on Friday, denouncing U.S. unilateral military actions against Venezuela and voicing solidarity with the Latin American nation. https://t.co/2yEvibc6Sm pic.twitter.com/RLazDVWafv — China Xinhua News (@XHNews) January 17, 2026
Ans: दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांच्या मते, अमेरिकेची व्हेनेझुएलावरील कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. अमेरिका साम्राज्यवादाचा प्रचार करत असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या लोकांचे म्हणणे आहे. याविरोधात केप टाऊनमध्ये लोक रस्त्यावर उतरले.
Ans: दक्षिण आफ्रिकेतील मादुरोच्या सुटकेची मागणी केली आहे, तसेच अमेरिके द्वारे इतर राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप थांबवण्याची आणि व्हेनेझुएलामधील तेलसंपत्तीवर दबाव रोखण्याची मागणी या निदर्शनांमध्ये केली जात आहे.






