
Venezuela’s President Maduro dances in defiance amid US pressure
नुकतेच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते जनतेसोबत थिरकताना दिसत आहेत. नुकतेच व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये रस्त्यावर लोकांना जल्लोष सुरु केला होता. या जल्लोषात अध्यक्ष मादुरो स्टेजवर नाचताना दिसले. जोरदार आवाजा गाणी म्हणत जनतेसोबत मादुरो थिरकाताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन दिसून येते की अमेरिकेच्या धमक्यांना ते घाबरत नाही. संभाव्य हल्ल्याच्या परिस्थितीती मादुरो निर्धास्त आहे. त्यांच्या या कृतीतून स्पष्ट होत आहे की, ट्रम्प यांनी कितीही धमक्या दिल्या तरी ते बिनधास्तपण आपल्या देशासोबत आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतरच हे दृश्य समोर आले आहे. यावरुन मादुरो अमेरिकेसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट होते.
🇺🇸🇻🇪 TRUMP: “MADURO, YOU’RE FINISHED” – MADURO: “WATCH ME DANCE” Venezuela’s capital exploded with noise and color as Maduro stepped onto the stage dancing, pumping his fists, and trying to project confidence while huge crowds packed the streets. The scene was loud, chaotic,… pic.twitter.com/5yL2B5HkJr — Mario Nawfal (@MarioNawfal) December 9, 2025
सध्या अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ल्याची तयारी करत असून यासाठी कॅरिबियन आणि प्युर्टो रिणकोमध्ये लष्करी तैनाती वाढवत आहे. लढाऊ विमाने, जहाजे, युद्धनौका समुद्री प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. व्हेनेझुएलाने देखील आपल्या सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बाह्य लष्करी दबावाला तोंड देण्यासाठी मादुरो लोकांना एकजूट होण्याचे आवाहन करत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर ड्रग्ज तस्करीचे आरोप केले आहे. ट्रम्पच्या मते, अमेरिकेत व्हेनेझुएलातून ८० टक्के ड्रग्ज तस्करी केली जाते. मादुरो स्वत: या ड्रग्ज कार्टेलला चालवतात. त्यांनी मादुरो यांच्याकडे या तस्कीराला बंद करण्याचा आवाहन केले आहे. तसेच असे न केल्यास लष्करी कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. दोन्ही देशातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून वाढत चालला आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.