अमेरिका-व्हेनेझुएला तणाव वाढला: युद्ध भडकू शकते... उड्डाणे रद्द, युद्धाची तयारी सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US Venezuela tensions : अमेरिका (America) आणि व्हेनेझुएलामधील(Venezuela) वाढता तणाव आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गत काही आठवड्यांपासून सुरू असलेली राजकीय आणि लष्करी धामधूम आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या वाढत्या लष्करी उपस्थितीमुळे आणि प्रदेशातील सुरक्षेच्या परिस्थितीमुळे जागतिक विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडे जाणारी उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात नवीन संघर्ष भडकण्याची भीती वाढली आहे.
यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या तीव्र सुरक्षा इशाऱ्यानंतर सहा प्रमुख विमान कंपन्यांनी तातडीने त्यांचे विमानसेवा ऑपरेशन्स थांबवले आहेत. यामध्ये स्पेनची Iberia, पोर्तुगालची TAP, चिलीची LATAM, कोलंबियाची Avianca, ब्राझीलची GOL आणि Caribbean Airlines यांचा समावेश आहे. फ्लाइट रडारच्या आकडेवारीनुसार अनेक विमानं उड्डाणाच्या वेळी थांबवण्यात आली आहेत. विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात सुरक्षा हमी नाही आणि कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
कोलंबियाच्या Aeronautica Civil ने स्पष्ट केले की Caracas जवळील Maquetia प्रदेशात लष्करी हालचाली प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत आणि अशा परिस्थितीत विमानवाहतूक करणे जोखिमदायक आहे. FAA च्या सूचनेत अनेक विमानांना “सर्व उंचीवर धोका” असल्याची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
याचवेळी अमेरिकेने या प्रदेशात आपली मोठी लष्करी उपस्थिती वाढवली आहे. त्यांच्या सर्वात मोठ्या विमानवाहू जहाजासह आठ युद्धनौका आणि अत्याधुनिक F-35 Fighter Jets तैनात करण्यात आले आहेत. या हालचालींमुळे जागतिक राजकीय तज्ञांच्या चर्चेला उधाण आले आहे की अमेरिका मादुरो सरकारविरुद्ध कार्यवाही करण्याच्या तयारीत आहे का?
🚨🇺🇸💥🇻🇪 The U.S. is sharply escalating pressure on Maduro: • The U.S. Air Force is intensifying operations off Venezuela’s coast
• F/A-18 fighters, RC-135 reconnaissance planes, and MQ-9A Reapers are now active
• The Reaper has been redeployed from Puerto Rico to El Salvador… pic.twitter.com/rWkQeOSuNq — The threat of missiles and drones (@StatWatch25) November 22, 2025
credit : social media
रॉयटर्सच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलावर “नवीन मोठी कारवाई” करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये गुप्त कारवाई, सायबर ऑपरेशन्स आणि सरकार बदलाचा प्रयत्न यांचा विचार केला जात असल्याचे सूचित झाले आहे. जरी मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू करण्याची अधिकृत घोषणा नसली, तरी सद्यस्थिती युद्धाच्या वातावरणासारखी दिसत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Reality : पाकिस्तानने हदद्च केली पार! दहशतवादासोबतच ‘हे’ काम करून जगभरातून बनले निंदेचे कारण
दरम्यान, काही विमान कंपन्यांनी परिस्थिती पाहून काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र बहुतांश ऑपरेटर स्थिती सुधारल्याशिवाय सेवा पुन्हा सुरू करणार नसल्याचे स्पष्ट करत आहेत. या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठ, तेलदर आणि भूराजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष व्हेनेझुएला-अमेरिका तणावाकडे लागले आहे, आणि पुढील काही दिवस या संघर्षाचे भविष्य ठरवणारे ठरू शकतात.
Ans: FAA च्या सुरक्षा इशाऱ्यामुळे आणि वाढत्या लष्करी हालचालींमुळे.
Ans: विमानवाहू जहाज, युद्धनौका आणि F-35 fighter jets.
Ans: अधिकृत घोषणा नाही, पण परिस्थिती युद्धासारखी गंभीर आहे.






