What does Arigato Gozaimas mean PM Modi Japan Visit
PM Modi Japan Visit : टोकियो/नवी दिल्ली : भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. सध्या सर्वत्र पंतप्रधान मोदींच्या जपानी दौऱ्याची चर्चा सुरु आहे. भारत आणि जपानच्या संबंधासाठी अधिक महत्वाचा दौरा मानला जात आहे. यावेळी जपानमध्ये पोहोचताच पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.
जपानचे (Japan) पंतप्रधान इशिबा शिगेरु यांनी त्यांचे जपानी पद्धतीने Arigato Gozaimas म्हणत स्वागत केले. दोन्ही नेत्यांच्या या भेटीतमध्ये भारत आणि जपानच्या सांस्कृतिक संवाद पाहायला मिळाला. टोकियोमधील भारतीय समुदायाने पांरपारिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत केले. भारतीय समुदायाच्या लोकांना गायत्री मंत्र आणि वैदिक श्लोक म्हटला.
पंतप्रधान मोदी जपानमध्येच पोहोचताच जपानी पंतप्रधान इशिबा यांनी Arigato Gozaimas म्हणत त्यांना अभिवादन केले. पण याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? तर Arigato Gozaimas याचा अर्थ खूप खूप धन्यवाद असा होतो. जपानमध्ये याचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो.
एकमेकांप्रती आदर, सन्मान दाखवण्यासाठी या शब्दाचा वापर होतो. अनोळखी लोक, जेष्ठ नागरिक किंवा दुकानदार, रेस्टॉरंट कर्मचारी, शिक्षक यांसारख्या सेवा देणाऱ्या लोकांनासाठी हा शब्द वापरला जातो. यातून लोक कृतज्ञता व्यक्त करतात.
पंतप्रधान इशिबा शिगेरू यांनी पंतप्रधान मोदींना जपानी दारुमा डॉलही भेट दिली. ही डॉल जपानी संस्कृतीत नशीब आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. या डॉलचा संबंध भारताशीही जोडला गेला आहे. दारुना परंपरा केवळ जपानमध्येच नव्हे तर तामिळनाडूच्या कांचीपुरम येथाल झेन बौद्ध धर्माचे संस्थापक, भारतीय भिक्षू बोधिधर्म यांचे प्रतीक मानली जाते. भिक्षू बोधिधर्म यांना जपानमध्ये दारुमा दैशी म्हणून ओळखले जाते. एक हजार वर्षांपूर्वी भिक्षू बोधिधर्म यांनी जपानला भेट दिली होती असे म्हटले जाते.
पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना भारतीय हस्तकलेने सजवलेला रमेन बाउल सेट भेट दिला. तसेच त्यांच्या पत्नीसाठी काश्मिरी पश्मीना शॉलही खास भेट दिली. हे भारत आणि जपानच्या सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक आहे.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी भारत-जपानच्या १५व्या शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. यावेळी दोन्ही देशांतील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. जपानने पुढील पाच वर्षात भारतात १० ट्रिलियनपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांना अधिक बळकटी मिळेल.
Israel Yemen War : ‘वाईट कृत्याचे परिणाम…’; इस्रायलच्या हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार