हुथी बंडखोरांचे पंतप्रधान अहमद अल-राहवी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Attack on Yemen’s Houthi : साना : सध्या मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांसोबत इस्रायलच्या संघर्षाने विध्वंस घडत आहे. नुकतेच इस्रायलने २८ ऑगस्ट रोजी साना येथे हुथी बंडखोरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात हुथी विद्रोह्यांच्या पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच हुथींचे संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करी अल-घमारी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही.
हुथी बंडखोरांनी इस्रायवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) २८ ऑगस्ट रोजी हल्ला केला होता. इस्रायलच्या सैनिकांनी हुथींच्या लष्करी तळांना आणि राष्ट्रपती भवनाला लक्ष्य केले होते. यामध्ये किमान १० लोक ठार झाल्याचे आणि ९० जखमी झाल्याची माहिती येमेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण
दरम्यान इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, “आम्ही हुथींना इशारा दिला होता. आमच्याविरोधात जो काणी शस्त्रे उचलेल त्याला शिक्षा होईल. यामुळे हुथींना त्यांच्या वाईट कृत्याचे परिणाम भोगावे लागतील.”
इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने हुथींवर अचूक हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक हुथी बंडखोरांच्या बड्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
हुथी बंडखोरांनी २०२३ पासून आतापर्यंत इस्रायलवर २५० हून अधिक वेळा हल्ले केले आहेत. इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी आणि पॅलेस्टिनींविरोधी कारवायांमुळे हुथींनी हे हल्ले केले आहेत. हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या लाल समुद्रातील जहाजांनाही १०० हून अधिक वेळा लक्ष्य केले आहे. यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे.
दरम्यान यापूर्वी अनेकवेळा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हुथींना कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले होते की, हुथींनी हल्ले थांबवले नाहीत तर त्यांना पूर्णत: नष्ट करण्यात येईल. त्यांचेही हाल हमाससारखे करण्यात येईल असे नेतन्याहूंनी म्हटले होते.
नेतन्यांहूच्या मते, येमेनमधील हुथींना, तसेच गाझातील हमास संघटनेला आणि हिजबुल्लाह संघटनेला इराणचे समर्थन मिळत आहे. हे फक्त इराणचे मोहरे आहेत. यांच्या माध्यमातून इराण मध्यपूर्वेत विनाश घडवत असल्याचा दावा नेतन्याहूंनी अनेक वेळा केला आहे.
सध्या इस्रायलच्या गाझामध्ये हमासविरोधी कारवाया सुरु आहे. हमासला गाझातून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रण इस्रायलने घेतला आहे. शिवाय यानंतर हुथींनाही हमासप्रमाणे नष्ट करण्यात येईल असे इस्रायलने म्हटेल आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा? बांगलादेश चीनकडून खरेदी करणार J-10 लढाऊ विमाने?