Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुठे गायब झाला पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ आणणारा युवा नेता? एकेकाळी बनला होता इस्लामिक कायद्याचा रक्षक

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत बाह्य आणि अंतर्गत संघर्षाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकारची डोकेदुखी बनलेला साद रिझवी याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता हा साद रिझवी कोण आहे हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2025 | 11:23 PM
where TLP Leader disappeared Sad Rizvi

where TLP Leader disappeared Sad Rizvi

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण
  • TLP प्रमुख साद रिझवी अचानक बेपत्ता
  • लोकांमध्ये रिझवी कुठे गायब झाल्याचे तर्क-वितर्क सुरु
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : गेल्या काही काळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानसोबत (Afghanistan) संघर्ष सुरु आहे, तर दुसरीकडे देशांतर्गतही गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानची तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP)ही कट्टर इस्लामिक संघटना शाहबाज सरकारची डोकेदुखी बनली आहे.

Kukur Tihar: एकीकडे लक्ष्मीपूजन तर दुसरीकडे कुत्र्यांची पूजा; हार घालून देशामध्ये साजरे केले जाते कुकुर तिहार?

TLP चे पंजाबमध्ये इस्रायल अन् शाहबाज सरकारविरोधी आंदोलन

या संघटनेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरोधात आणि इस्रायलविरोधात पंजाबमध्ये आंदोलन केले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या आंदोलनात पाकिस्तानी पोलिस, लष्करी अधिकारी आणि अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु या आंदोलनानंतर TLP चा प्रमुख साद रिजवी अचानक गायब झाला आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला. सध्या साद रिजवी नेमका कुठे आहे याबद्दल अनेत तर्क-वितर्क लावले जात आहे. मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिस सध्या साद रिझवी आणि त्याचा भाऊ अनस रिझवीचा शोध घेत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पाकिस्तानच्या अधिकृत काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर पळून गेले आहे. मुरिदके येथे दोघांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु येथून त्यांनी पळ काढला आणि त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

सध्या पंजाब पोलिसांनी सर्वत्र अलर्ट जारी केला असून दोन्ही भावांचा शोध घेतला जात आहे. सध्या दोघेही पोलिसांच्या कारवाईत जखमी झाले असल्याचे मानले जात आहे, परंतु अद्याप याची पुष्ट करण्यात आलेली नाही. याच वेळी पंजाब सरकारने TLP वर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. तसेच फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी देखील साद रिझवीचा शोध घेत आहे. त्याच्या बँकांच्या खात्यांचा मागोवा घेतला जात आहे.

कोण आहे साद रिझवी?

३१ वर्षीय साद रिझवी एक कट्टर इस्लामिक धार्मिक नेता म्हणून ओळखला जातो. तो TLP चे संस्थापक खादीम हुसैन रिझवी यांचा मुलागा आहे. त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर TLP ची जबाबदारी स्वाकरली होती. साद रिझवी स्वत:ला पैगंबर मोहम्मद यांचा आणि इस्लामिकतेचा रक्षक म्हणून संबोधतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानमध्ये TLP ने अनेक हिंसक आंदोलने केली. नुकतेच पाकिस्तानच्या पंजाबमध्ये इस्रायलीविरोधात झालेल्या आंदोलनामागे त्याचा हात असल्याचे सांगितले जाते. सध्या त्याचा ठावठिकाणा घेतला जात आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढणार? इराणची इस्रायलविरोधात मोठी कारवाई; मोसादच्या हेरगिरी करणाऱ्याला दिली फाशी

Web Title: Where tlp leader disappeared saad rizvi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

North Korea : ‘दक्षिण कोरियाला सोडणार नाही’, किम जोंग उन यांच्या बहिणीचा आक्रमक पवित्रा; पूर्व आशियात भीतीचे सावट
1

North Korea : ‘दक्षिण कोरियाला सोडणार नाही’, किम जोंग उन यांच्या बहिणीचा आक्रमक पवित्रा; पूर्व आशियात भीतीचे सावट

India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
2

India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

Israel Iran War : ‘युद्धाचा सराव की अमेरिकेचा दबाव…’; नेतान्याहूंनी ऐनवेळी इराणच्या सीमेवरून का मागे घेतले फायटर जेट?
3

Israel Iran War : ‘युद्धाचा सराव की अमेरिकेचा दबाव…’; नेतान्याहूंनी ऐनवेळी इराणच्या सीमेवरून का मागे घेतले फायटर जेट?

Shamonda Virus: युरोपमध्ये नव्या विषाणूची दहशत! प्राण्यांमधून मानवामध्ये पसरल्याने फ्रान्समध्ये एकाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क
4

Shamonda Virus: युरोपमध्ये नव्या विषाणूची दहशत! प्राण्यांमधून मानवामध्ये पसरल्याने फ्रान्समध्ये एकाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.