
white house chief of staff susie wiles donald trump and elon musk
सुसी वेल्स (वय 68) यांची व्हाइट हाउसच्या चीफ ऑफ स्टाफ 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 1997 मध्ये जॅक्सनव्लिलचे महापौर जॉन डिंकल यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आहे. त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे, त्या प्रसिद्ध अमेरिकन फुटबॉल खेळाडू पॅट समरॉल यांच्या कन्या आहेत. विल्स आणि ट्रम्प यांच्यात दीर्घकाळापासून मैत्री आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सुसी यांना चीफ ऑफ स्टाफची महत्त्वाची भूमिका सोपवली होती.
विल्स यांनी मुलाखतीत सांगितले की, एलॉन मस्क डॉग चीफ म्हणून अनेक लोकांना काढून टाकत असल्याचे त्यांना समजले, ज्यामध्ये व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. हे समजताच त्यांनी याला विरोध केला. ट्रम्प यांना समजावून सांगितले. पण त्यांनी जेव्हा मस्क यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ते केटामान ड्रग्ज घेत असल्याचे समजले. यापूर्वी देखील एका अमेरिकन जर्नलमध्ये हा दावा करण्यात आला होता. अमेरिकेत या केटामाइन ड्रग्जवर बंदी घालण्यात आली आहे.
ट्रम्प बाबात बोलताना त्यांनी म्हटले की, त्या ट्रम्प यांना यांना नेहमी जगाबद्दल कमी बोलण्याच, पण देशातील महागाईवर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांना ते कधीही ऐकले नसल्याचे विल्स यांनी म्हटले. तसेच विल्स यांनी म्हटले की, ते स्वत:ला शांतता प्रस्थापित करणारे दूत म्हणतात, त्यांनी आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. परंतु लोकांचा यावर विश्वास नाही. तसेच ट्रम्प मद्यपान करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
याशिवाय ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये गुप्त अमेरिकन योजना राबवू इच्छित असल्याचाही खुलासा केला. त्यांनी सांगितले की, मादुरो त्यांच्यापुढे झुकत नाहीत, तोपर्यंत ते त्यांच्याविरोधात कारवाई करत राहतील असे म्हटले आहे. सध्या सुसी विल्सच्या या दाव्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरु आहे.
Ans: प्रसिद्ध अमेरिकन फुटबॉल खेळाडू पॅट समरॉल यांच्या कन्या असून त्यांच्या नावामुळेच सुसी विल्स यांना ओळख मिळाली आहे.,
Ans: सुसी विल्स यांनी एलॉन मस्क अमेरिकेत बॅन असलेल्या केटामाइन ड्रग्जचे सेवन करतात असा दावा केला आहे.
Ans: सुसी विल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प मद्यपान करत असल्याचे म्हटले आहे. तसेच ते अमेरिकेत गुुप्त योजना राबवू इच्छित असून मादुरो हार मानत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर हल्ले करत राहणार असल्याचा दावा केला आहे.