
Pakistan Extends Airspace Ban on India
पाकिस्तानकडून भारतीय विमानांना हवाई क्षेत्रात बंदी कायम; जाणून घ्या काय होत आहे परिणाम?
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई बंदी ही 24 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे. यामुळे भारताचे कोणतेही व्यावसायिक विमाने किंवा लष्करी विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करु शकणार नाहीत. बुधवारी (17 डिसेंबर) पाकिस्तानच्या विमानतळ प्राधिकरणारेन जारी केलेल्या नोटम नुसार, पाकिस्तानने आणखी एका महिन्यासाठी भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. भारताद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा लीजवर घेतलेल्या सर्व नागरी, लष्करी विमानांवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
एप्रिल २०२५ मध्ये भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निरापराध नागरिकांचा बळी गेला होता. यानंतर भारताने ३० एप्रिल पासून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केले. २४ मे पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही २४ जूनपर्यंत, पुन्हा २४ जुलै पर्यंत, नंतर 24 नोव्हेंबर, आणि आता 24 डिसेंबरपर्यंत आहे. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारतासाठी हवाई क्षेत्रावर बंदी घातली होती.
दरम्यान सध्या भारताच्या निर्णयानुसार, सध्याची मुदत 24 डिसेंबरपर्यंत केली असून यापूर्वी पाकिस्तानने एक आठवडा आधीच हवाई क्षेत्र बंदीची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. भारत लवकरच याला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विमान कंपन्यांवरील आणि विमानांवरील बंदी समान कालावधीसाठी वाढण्याची शक्यता आहे. सलग नव्यांदा दोन्ही देशांनी ही बंदी वाढवली आहे.
पाकिस्तानने भारतीय हवाई विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे, मात्र याचा उलट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. पाकिस्तानी विमानांना लांब मार्गाने उड्डाण करावे लागत असल्याने त्यांचा खर्च वाढला आहेत. शिवाय भारताकडून मिळणारे निश्चित रक्कम देखील बंद झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यस्थेलाही फटका बसला आहे.
‘भारतात एवढी हिंमत नाही…’ ; LeT च्या दहशतवाद्याने भारताला उघड धमकी देत केलं भडकाऊ भाषण, VIDEO VIRAL
Ans: पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी 24 जानेवारी 2026 पर्यंत हवाई क्षेत्रसाठी बंदी वाढवली आहे.
Ans: एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान तणावात प्रचंड वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी एकमेकांवर एअरस्पेस बंदी लागू केली आहे.
Ans: पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारतीय विमानांकडून मिळणारे ओव्हरफ्लाइट शुल्क बंद झाले असून लांब मार्गाने पाकिस्तानच्या विमानांना उड्डाण करावे लागत आहे. यामुळे पाकिस्तानच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.