Who is Abdul Rashid Dostum Taliban returns their valuables
काबूल: भारत आणि तालिबानमधील संबंध गेल्या काही काळापासून सुधारत आहेत. दोन्ही देशांमध्ये करार आणि सहकार्य वाढत आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. तालिबानने भारताच्या जवळचे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम यांच्या मौल्यवान वस्तू पर केल्या आहे.
यापूर्वी अमेरिकेने देखील तालिबानला अफगाणिस्तानचे लष्करी साहित्य परत करण्यास सांगतिले होते. परंतु तालिबानने, तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे साहित्य घेऊन जा, असे म्हटले होते. मात्र भारताचे मित्र अब्दुल रशीद यांच्या मौल्यवान वस्तू तालिबानने स्वत:हा परत केल्या आहेत. यामुळे तालिबानने भारताच्या मित्रासमोर आत्मसमर्पण केले असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तन यांचे अठरा घोडे उत्तरेकडील जोव्झान प्रांतात त्यांच्या भावाकडे सोपवण्यात आले. घोडे हस्तांतरिताची प्रक्रिया प्रांतीय राजधानी शेबरघानमध्ये नियुक्त आयोगाच्या देखरेखीखाली करण्यात आली.
तालिबानच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयाकडून दोन प्रक्रियेद्वारे घोड्यांची देवणा-घेवाण करण्यात आली. तालिबान अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, गेल्या चार वर्षात शेबरघानमधील आणि पगारावर सुमारे १.२ कोटी अफगाणी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
१९४५ मध्ये अफगाणिस्तानच्या ख्वाजा दु कोह जिल्ह्यात जन्मलेले अब्दुल रशीद हे शक्तिशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.त्यांनी अफगाण माजी लष्करी अधिकरी, सरदार आणि निर्वासित राजकारणी अशा वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.
रशीद जुनबिश-ए-मिल्ली याचे रादकीय संस्थापक म्हणून कामकाज पाहिले आहे. सोव्हिएत-अफगाण युद्धादरम्यान सुरुवातीव अफगाण कमांडो सैन्याचा भाग होते. तसेच माजी अफगाण कम्युनिस्ट सरकारच्या सैन्यात एक वरिष्ठ लष्करी अधिकारी म्हणून देखील राहिले.
अब्दुल रशीद दोस्तम यांनी तालिबानशी दीर्घकाळ लढाई केली. २०२१ मध्ये ते युद्धातून परतले आणि देश सोडून गेले. तालिबानच्या उत्तरेकडील मलिशिया सैन्याचेही नेतृत्व त्यांनी केले आहे.
भारत आणि तालिबान संबंधांमध्ये गेल्या काही काळापासून सुधार होत आहे. पाकिस्तानशी तणावादरम्यान देखील तालिबानने भारताला पाठिंबा दर्शवला होता. या वेळी भारताने तालिबानशी उच्चस्तरीय बैठक देखील घेतली होती. या बैठकीवेळी तालिबानने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा दर्शवला.