पॅरासेलिंग करताना घाबरली अन् केलं असं काही...; 19 वर्षीय तरुणीने थेट कवटाळले मृत्यूला, Video Viral (फोटो सौजन्य: एक्स/@BasedSammy)
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅरासेलिंगदरम्यान सर्बियाच्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सर्बिातील १९ वरषीय तिजाना राडोंजिकचा पॅरासेलिंग दरम्यान १६० फुट उंचीवरुन समुद्रात पडून मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिजाना मॉन्टेनग्रोमधील बुडवा येथे किनारी शहरात सुट्टीसाठी गेली होती. यावेळी उंचीवर गेल्यावर अचानक तिजानाला भीती वाटू लागली. भीतीपोटी तिने सेफ्टी हार्नेस सोडला यामुळे ती काही सेकंटाच थेट एड्रियाटिक समुद्रात पडली. तिला वाचवण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू होता.
न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तिजाना बुडवा येथील एड्रियाटिक समुद्रावर १६० फूट उंचवरी पॅरासेलिंग करत होती. यावेळी तिला अचीनक भीती वाटू लागल्याने ती सेफ्टी हार्नेस काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिजाना एका स्थानिक एजन्सीसाठी प्रमोशन व्हिडिओ शूट करत होती असा दावाकरण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
🇲🇪 | A 19-year-old student died while parasailing in Montenegro after suffering a panic attack mid-air. Witnesses say she screamed “Put me down!” and unbuckled her harness before falling 50 meters to her death. pic.twitter.com/Iz9ajpGOm0
— SamOfTexas (@BasedSammyH) June 3, 2025
घटनेनंतर पालकांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर तिच्या पालकांना कळवण्यात आले, तेव्हा त्यांना खूप दु:ख झाले. तिजानाच्या पालकांना एक भावनिक संदेश दिला. त्यांनी म्हटले की, आम्हाला वाटतच नाही की आमची मुलगी आम्हाला सोडून या जगातून गेली आहे. हे आम्ही स्वीकारु शकत नाही. ती नेहमीच आमच्या हृद्यात राहील. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला तिची आठवण येत राहिले.
तसेच पॅरासेलिंग कंपनीचे मालक मिर्को क्रडझिक यांनी या घटनेबद्द शोख व्यक्त केला आहे. त्यांनी सांगतिले की, ताजिना रॅडोंजिक सुरुवातीला उत्साहात होती, परंतु अचानक काय घडले तिने एवढे मोठे पाऊल का उचलले हे समजले नाही. या अपघानंतर सर्वांना धक्का बसला आहे. सध्या या घटनेचा पोलिस तपास करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशीही केली जात आहे. अलीकडे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पॅरासेलिंग दरम्यान अनेकांचा भीतीने, तसेच अपघाताने बळी गेला आहे.