Anti Immigration Protest UK : लंडनमध्ये १ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर; अवैध स्थलांतरितांविरोधात हिंसक निदर्शने
Protest against Illegal Immigration in Britain : लंडन : नेपाळ आणि फ्रान्स नंतर आता ब्रिटनमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. परंतु हे आंदलोन सरकारविरोध नसून देशातील बेकायदेशीर स्थालांतरितांविरोधात होते. शनिवारी (१३ सप्टेंबर) ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये १ लाखाहून लोक रस्त्यावर उतरले होते. या निदर्शनाचे नाव, ‘United The Kingdom’ असे ठेवण्यात आले होते. याचा उद्देश देशातील बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचा होता, ज्याचे नेतृत्व स्थलांतरविरोधी नेते टॉमी रॉबिन्सन यांनी केले.
याच दिवशी देशातल ‘Stand Up to Racism’ नावाचेही निदर्शन सुरु होते. यामध्ये ५००० हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. यामुळे लंडनमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. एकाच वेळी दोन निदर्शनांमुळे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी चकामक झाली. परंतु अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पॅलेस्टाईनला समर्थन देणं पडलं महागात; ॲमेझॉनने कर्मचाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता
२८ हजार स्थलांतरितांची लंडनमध्ये बेकायदेशीरपण घुसखोरी
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा २०२५ मध्ये ब्रिटनमध्ये बेकायदेशीर मार्गाने जगभरातून २८ हजारांहून अधिक लोकांनी घुसखोरी केली आहे. यामुळे या स्थलांतरितांना देशातून हाकलून लावण्याची मागणी केली जात होती. ही रॅली ब्रिटनची सर्वात मोठी उजव्या विचारसरणीची रॅलमी मानली गेली. दरम्यान या निदर्शनाला प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांचेही समर्थन मिळाले.
एलॉन मस्क यांचे स्थलांतरविरोधी निदर्शनाला समर्थन
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी एका व्हिडिओद्वारे या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. द इंडिपेंडट मीडिया चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी टॉमी रॉबिन्सशी संवाद साधला. त्यांनी रॉबिन्सन यांना सांगितले की, ब्रिटनमध्ये संसद बरखास्त झाली पाहिजे. आता हिंसा वाढण्याची शक्यता आहे. पण मागे हटून चालणार नाही. तर एकतर लढा किंवा मरा असे त्यांनी म्हटले.
“You either fight back, or you die. You either fight back, or you die. And that’s the truth.”
Elon Musk addresses Tommy Robinson and millions of British patriots in London at Unite the Kingdom. pic.twitter.com/46INJXP59i
— Ian Miles Cheong (@stillgray) September 13, 2025
एकाच वेळी दोन निदर्शनांमुळे उडाला गोंधळ
लंडनमध्ये एकीकडे स्टँड अप फॉर रेसिझम आणि दुसरीकडे युनायडेट द किंगडम अशी दोन आंदोलन सुरु होती. यामुळे दोन्ही गटांतील लोकांना एकत्र येऊन संघर्ष वाढून नये यासाठी पोलिसांना दोन्ही गटांना घेराव घातला होता. परंतु दोन्ही गटांतील लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि घेराव तोडला. परिणामी पोलिसांनच्या तैनातीची संख्या वाढवण्यात आली. १६०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले.
सरकारविरोधात घोषणाबाजी
दरम्यान यावेळी निदर्शनकर्त्यांनी यूनियन जॅक आणि सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडेही फडकवले, अनेकांनी अमेरिका आणि इस्रायली झेंडे देखील घेतले होते. तर काहींनी मेक द अमेरिका ग्रेट अगेनच्या टोप्या घातल्या होता. यावेळी सरकारविरोधी आणि पंतप्रधान कियर स्टार्मर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
FAQs (संबंधित प्रश्न)
ब्रिटनमध्ये का सुरु होते आंदोलन?
ब्रिटनमध्ये दोन कारणांमुळे तीव्र निदर्शने झाली, यामध्ये एका गटाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात निदर्शने केली. तर दुसऱ्या गटाने रेसिझमविरोधात निदर्शने केले.
आंदोलनात काय घोषणाबाजी करण्यात आली?
आंदोलनात सराकराविरोधी घोषणाबाजी करत, बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवा असे नारे देण्यात आले.