'Will not let Syria become another Lebanon'; Israel bombs southern Syria
दमास्कस: इस्त्रायलने पुन्हा एकदा सीरियावर जोरदार हल्ला केला आहे. यामुळे सीरियाच्या सर्वत्र परिसरात गोंधळ उडाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलयने सीरियाच्या कुनेइट्रा ग्रामीण भाग आणि दारा प्रांतता हल्ले केले आहेत. दारा, अल-सुवैदा, कुनेइत्रा आणि दमास्कस या भागांमध्ये इस्त्रायली सैनयाने मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्याचे स्पष्टकरण देताना इस्त्रायलने अदसच्या राजवटीन वापरलेल्या लष्करी तळांना आणि शस्त्रास्त्रांना नष्ट करण्यासाठी हे हल्ले केले असल्याचे म्हटले आहे.
‘सीरियाला दूसरे लेबनॉन बनून देणार नाही’
तसेच इस्त्रायलचे सुरक्षा मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी हल्ल्यांबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, या हल्ल्यामागचा हेतू दक्षिण सीरियाला दक्षिण लेबनॉनमध्ये परिवर्तित होऊ न देणे आहे. यामुळे इस्त्रायली सैन्य दक्षिण सीरियात ताबडतोब हल्ले करत आहे.
BREAKING:
Israel is heavily bombing Syria’s capital city of Damascus right now.
There is no justification for this criminal aggression—just pure terror inflicted on Syrian families in the middle of the night. pic.twitter.com/5sBXxz3LzJ
— sarah (@sahouraxo) February 25, 2025
सीरियात इस्त्रायविरोधी आंदोलने
काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये इस्त्रायली विरोधात निदर्शने काढण्यात आली होती. असद च्या सत्तापालटानंतर इस्त्रायलने संधी साधत सीरियाचा मोठा भूभाह ताब्यात घेतला होता. यामुळे सीरियन नागरिकांनी इस्त्रायलने सीरियातून माघार घ्यावी आणि त्यांच्या लोकांची जमीन त्यांना परत करावी अशी मागणी केली होती.
यामुळे इस्त्रायलने चिंता व्यक्त केली की जर अल-शाम तहरीर(HTS) च्या विद्रोही गटाला असद सैन्याची शस्त्रे मिळाल्यास ते इस्त्रायलवर हल्ला करु शकतात.
अल-जुलानीच्या हाती सीरियाची सत्ता
गेल्या वर्षी 2024 मध्ये बंडखोर गट अल-शाम तहरीरने दहशतवादी हल्ले केले आणि सीरियातील असदची सत्ता संपुष्टात आणली. त्यानंतर सीरियाचे नेतृत्व अल-शाम तहरीर गटाचे प्रमुख अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली आले. मात्र, इस्त्रायलला हे मान्य नव्हते.
यामुळे इस्त्रायलने गोलान हाइट्स या वादग्रस्त क्षेत्रात आपले सैन्य तैनात केले होते. सीरियात विद्रोही गटांचे सत्तास्थापन झाल्याने अमेरिका, रशिया, इराण तुर्की आणि इस्त्रायल या देशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे इस्त्रायलने आपल्या सुरक्षेसाठी हल्ले केले असल्याचे म्हटले आहे.