चिलीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने मेट्रो आणि व्यवसाय ठप्प; देशभरात गोंधळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सॅंटियागो: चिलीमध्ये मंगळवारी (25 फेब्रुवारी) मोठा वीजपुरवठा खंडित झाला, यामुळे संपूर्ण देशात गोंधळ उडाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने याचा परिणाम उत्तरेकडील अरिका पासून दक्षिण भागातील लागोस पर्यंत झाला होता. चिलीच्या आपत्ती व्यवस्थानपन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 90% लोकसंख्या वीजेपासून वंचित राहिवे. गेल्या दहा वर्षातील हा सर्वात मोठा वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना होती.
मेट्रो ठप्प – हजारो प्रवासी अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने सॅंटियागोटी मेट्रो सेवा ठप्प झाली. परिणामी हजारो प्रवाशांना भूमिगत स्थानकांमधून बाहेर काढण्यात आले. सॅंटियागो मेट्रो ही रोज 2.3 दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवते. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय झाली. सुदैवाने, मेट्रो प्रशासनाने तत्काळ प्रवाश्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
वाहतूक व्यवस्था कोलमडली
सरकारने वीजपुरवठा खंडित होण्यामागे कोणताही दहशतवादी हल्ला नसून यंत्रणेतील तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान अनेक शहरांमध्ये सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांना तासनतास चालत घरी पोहोचावे लागले. अनेक कार्यालये आणि दुकाने बंद करावी लागली.
नागरिकांचे हाल
या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना अडचणींना समारो जावे लागले. एका नागरिकेने म्हटले की, “लाईट गेल्यामुळे आम्हाला ऑफिसधून लवकर सोडण्यात आले पण घरी कसे जायचे याची चिंता होती. सर्व बस भरलेल्या आहेत” आणखी एका नागरिकाने तो बॅंक कर्मचाऱ्याने सर्व बॅंक व्यवहार ठप्प झाल्याचे सांगितले.
राष्ट्राध्यक्षांनी घेतला परिस्थितीचा आढावा
या संकटाचा आढावा घेत राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरीक यांनी राजधानीचे हेलिकॉप्टरद्वारे निरीक्षण केले. तसे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सँटियागोमधील एका मनोरंजन उद्यानातील एका मोठ्या झोक्यावर अनेक लोक अडकले होते, मात्र बचाव पथकाने त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
दक्षिण अमेरिकेतील सर्वात स्थिर वीजपुरवठा व्यवस्थापैती एक चिलीची आ. मात्र, मंगळवारी (25 फेब्रुवारी) झालेला वीजपुरवठा 15 वर्षातील सर्वात मोठा वीजपुरवठा आहे. यापूर्वी 2010 मध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला होता.
देशभरात गोंधळ
वीजपुरवठा खंडित झाल्याने दुकाने, कार्यालये बंद करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था कोलमडली. सध्या प्रशासनाने बिघाडाचे मूळ कारण शोधण्यासाठी तपास सुरु केला असून नागरिकांना सर्व गोष्टी शांतते घेण्याचे, गोंधळून न जाण्याचे आवाहन केले आहे.