will Pakistan able to retaliate against India Four Factor Operation Sindoor, know the details
नवी दिल्ली: अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा दोन आठवड्यांनतर बदला घेतला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केली. या हल्ल्यात 100 हून अधिक ठार दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानने नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान गप्प बसणार नाही, या घृणास्पद हल्ल्याची शिक्षा भोगावी लागेल. परंतु तज्ञांच्या मते पाकिस्तान हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाही, यासाठी काही कारणे आहेत. याबद्दल आपण काही मुद्द्याद्वारे जाणून घेऊयात.
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेद्वारे पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या स्ट्राईकने भारताने संदेश दिला आहे की, भारताचा हा लढा केवळ दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आहे, पाकिस्तान विरोधी नाही. यामुळे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्यास जागतिक स्तरावर याचा मोठा फटका बसेल. यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी एका मुलाखतीदरम्यान दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचे मान्य केले होते.
पाकिस्तानची 9 मे रोजी कर्जासाठी IMF बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. परंतु भारताने दोन दिवसापूर्वीच हल्ला करुन पाकिस्तानला संकटात पाडले आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास युद्धाची परिस्थिती निर्माण होती. अशातच IMF कडून पाकिस्तानला कर्ज मिळणार नाही. यामुळे पाकिस्तान आर्थिक संकटात अडकेल. आधीच पाकिस्तानने चीनसारख्या अनेक देशांकडून मोठे कर्ज घेतलेल आहे.
यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावेळी अमेरिका, तसेच रशिया हे दोन्ही महासत्ता देशाच्या पाठिंबा पाकिस्तानला मिळणे कठीण आहे.
भारत आणि रशियाचे गेल्या अनेक काळापासून संबंध अधिक दृढ झाले आहेत. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी पोनवरुन संवाद साधला होता. यावेळी त्यांनी दहशवाद्यांना संपवणे महत्वाचे असल्याचे म्हटले होते. तसेच मंगळवारी ट्रम्प यांनी भारताला दहशतवाद विरोधात पाऊल उचलण्यास सांगितले होते. तसेच दहशतावादाविरोधात लष्करी मदतीचेही देण्याचे आश्वासन दिले होते. यावरुन स्पष्ट होते की, अमेरिका भारताच्या बाजूने आहे. पंरतु चीन पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. पंरुत अद्याप कोणतीही ठोस मदत केलीली नाही. या सर्व कारणांमुळे पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देता येणार नाही.