Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

US India Relations : भारत आणि अमेरिकेच्या संबंधामधील कटुता आता सौम्य होताना दिसत आहे. दोन्ही देशांनी सकारात्मक पाऊल उचलत द्विपक्षीय संबंध महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे व्यापार संबंध सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 06, 2025 | 08:45 PM
Will the trade differences between India and the US end Know what experts says

Will the trade differences between India and the US end Know what experts says

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतविरोध धोरण पडले नरम
  • पंतप्रधान मोदींचाही सकारात्मक प्रतिसाद
  • भारत आणि अमेरिका व्यापार संबंध सुधारण्याची चिन्हे

India America Relations :गेल्या काही काळात वॉशिंग्टन आणि दिल्लीतील संबंधामध्ये तणापूर्ण वातावरण होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय आयातींवर ५०% कर लादला आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. पण यामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधामध्ये कटुता निर्माण झाली. शिवाय ट्रम्प यांच्या सततच्या भारतविरोधी धोरणांमुळे दोन्ही देशांत अविश्वास वाढत गेला. दरम्यान ट्रम्प यांनी अचानकसूर बदलले असून मोदींना आपला मित्र म्हटले आहे, तर भारतासोबतच असंबंध अधिक खास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवाय यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील ट्रम्प यांचे मनापासून कौतुक करत द्विपक्षीय संबंधावर आणि व्यक्तीगत मैत्रीवरही भर दिला आहे. यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील भारतासाठी अमेरिकेचे संबंध अधिक महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचिी भारतविरोधी भूमिका नरम होताना दिसत आहे, मात्र भारत आणि रशिया संबंधावरुन ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहेच.

कोण आहेत फातिमा पैमन? ऑस्ट्रेलियन संसदेत Gen Z स्टाईलमधील टीकात्मक भाषणामुळे पुन्हा चर्चेत

जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ? 

  • याच वेळी काही विश्लेषकांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांनी ते मोदींचे नेहमी चांगले मित्र राहतील असे म्हटले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या विशेष संबंधाबद्दल चिंका करण्यासारखी कोणतीही बाब नाही. यातून भारत सरकारविरोधात असलेले धोरणे पुन्हा सौम्य होताना दिसत आहेत. शिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील पंतप्रधान मोदी भारत आणि अमेरिका संबंधाना खूप महत्व देतात तसेच ट्रम्पसोबतच्या वैयक्तिक संबंधाला देखील त्यांनी Personal Equation म्हटले आहे. हे संबंध दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध टिकवून ठेवण्यासाठी चांगले असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे भारताची डळमळत असलेला विश्वासही पुन्हा उभारत असल्याचे यातून दिसून येते, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.
  • दरम्यान दोन्ही देशांच्या संबंध सुधारण्यासाठीच्या सकारात्मक प्रतिक्रियेनंतर आता उपस्थित होतो तो म्हणजे व्यापाराचा मुद्दा. सध्या दोन्ही देशांतील व्यापारामध्ये देशाच्या दीर्घकाला हितासाठीच्या संबंधामुळे तणाव निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना देशात नोकऱ्या वाढवण्यासाठी, तसेच रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी टॅरिफचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी सांगितले. परंतु सध्या त्यांनी भारतसोबत संबंधांना महत्व देत सकारात्मक विधान केले आहे. यामुळे भारतविरोधी आवाज उठवणाऱ्यांची तीव्रता कमी होईल. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये थेट संवादही वाढेल आणि पुढील निर्देश दिले जातील.
  • शिवाय भारताने देखील अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, दिल्लीची रशियाकडून तेल खरेदी ही राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थैर्यासाठी आहे. तसेच रशियासोबत भारताचे धोरणात्मक संबंध गेल्या अनेक काळापासून आहेत. यामुळे हे संबंध जागतिक संतुलन टिकून ठेवण्यासाठी कायम राहतील. अमेरिकेप्रमाणेच रशियाही भारताचा मित्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रशियाशी संपर्क हा जागतिक भल्यासाठी असल्याने याच अमेरिकेशी संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही हे यातून स्पष्ट होते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याच वेळी चीनशी जवळीक साधण्याचा भारताचा कोणताही मानस नसल्याचेही स्पष्ट होते.
  • या तणावाच्या काळात दोन्ही देशांमध्ये पडमागेही चर्चा सुरु होती. भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकाराने अमेरिकेचा दौरा करुन तेथील गुप्तचर आणि कायदा अमंलबजावणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे भारताला विश्वास आहे की, अमेरिकेसोबतच संबंध पुन्हा सुधारतील. तसेच अमेरिकेने देखील व्यापारातील मतभेद हे तात्पुरते आहेत आणि भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूच राहतील असा स्पष्ट संदेश दिला आहे. यामुळे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संवाद झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुधारतील. येत्या काळात दोन्ही देशात व्यापार करार, सुरक्षा सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारीला नवी गती प्राप्त होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

स्री असणं ठरलं गुन्हा! भूकंपात तालिबान फतव्यामुळे महिलांची ३६ तास दुर्दशा ; पुरुष बचाव कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास दिला नकार

Web Title: Will the trade differences between india and the us end know what experts says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

ब्रिटीश पथकाची तिहार तुरुंगाला भेट; माल्ल्या-नीरव मोदीसह फरार आरोपींना लवकरच भारतात आणणार?
1

ब्रिटीश पथकाची तिहार तुरुंगाला भेट; माल्ल्या-नीरव मोदीसह फरार आरोपींना लवकरच भारतात आणणार?

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने ‘या’ देशातील कित्येक नवजात बालकांचा जीव धोक्यात! ताज्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
2

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने ‘या’ देशातील कित्येक नवजात बालकांचा जीव धोक्यात! ताज्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया
3

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर
4

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.