
US Snow Storm
सध्या या जोरदार बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. लाखो घरांमध्ये वीज पूर्णपमे गेली आहे. यामुळे लोकांना हिटर वापरता येत नसल्याने थंडीत गारठून मृत्यूला बळी पडत आहेत. अमेरिकेच्या टेक्सास राज्यात मोठा ब्लॅकआउट झाला आहे. उर्जा विभागाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून गरजेपूरतीच वीज वापरण्याचा सल्ला दिला आहे. मोठ्या संस्थांना स्वत:च्या वीज स्त्रोतांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
याशिवाय जोरदार बर्फवृष्टीमुळे वाहतूकीवरही मोठा परिणाम होत आहे. रस्त्यांवर बर्फाची पांढरी चादर पडली आहे. गाड्या बर्फाखाली दबल्या गेल्या आहेत. रस्त्यांवर घसरण निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच हवाई वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहे. एका दिवसात १० हजाराहून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत.
या जोरदरा बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपूर्वीच मेन राज्यांतील बैंगोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खाजगी विमानातचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात क्रू मेंबर्ससह ८ प्रवासी होते. या प्रवाशांच्या स्थितीबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही. विमान धावपट्टीवरुन घसरले असल्याचे सांगितले जात आहे. बैंगोर विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे धावपट्टीवर बर्फ साठला आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता होमलँड सिक्युरिटी विभागाने १७ राज्यांमध्ये आणि वॉशिंग्टन डीसी येथे हवामान आणीबाणी जाहीर केली आहे. सध्या रस्त्यांवर, घरांवरील बर्फ काढण्याचे काम सुरु आहे. याशिवाय वीज तारा दुरूस्तीचाही प्रयत्न सुरु आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना मदतीचे आणि बचावाचे कार्य सुरु केले आहे. सध्या लोकांना घरातच राहण्याचा आणि आवश्यक असल्यासवरच बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात
Ans: अमेरिकेतील हिमवादळामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवटा खंडित झाला आहे. भीषण थंडीमुळे लोक गारठून मरत आहेत. तसेच वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
Ans: अमेरिकेत हिमवादळामुळे तापमान अत्यंत कमी झाले आहे, जोरदार थंड वारे वाहत आहेत यामुळे भीषण थंडी पडली असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: सध्या अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने १७ राज्यांमध्ये आणि वॉशिंग्टन डीसी येथे हवामान आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच वीजांच्या तारा दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे, ज्यामुळे वीजपुरवठा पुन्हा सुरु करता येईल. तसेच नागरिकांना केवळ आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.