
David Rubenstein
युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमध्ये बोलताना डेव्हिड रुबेनस्टाइन यांनी म्हटले की, भारताची अर्थव्यवस्था येत्या २० ते ३० वर्षात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून त्यांनी अमेरिका आणि चीनला भारत मागे टाकेल असे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानुसार, भारताच्या सध्याच्या आर्थिक वाटचालीकडे पाहता हा दावा वास्तवादी वाटतो.
रुबेनस्टाईन यांनी म्हटले की, भारताची लोकसंख्येकडे लक्ष वेधत त्यांनी म्हटले की, भारताच्या तरुणांकडे आणि कार्यक्षम मनुष्यबळाकडे पाहता भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने अगदी जवळ आहे. भारताची तरुण पिढी ही शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, आणि उद्योजकेतेमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. हीच पिढी भारताच्या महासत्ता बनण्यासाठी कणा ठरु शकते असे रुबेनस्टाईन यांनी म्हटले.
यामुळे त्यांनी भारताला सल्ला दिला की, मध्यर्गीय लोकसंख्येच्या देशांतर्गत मागणीला बळ द्या, जे अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यांनी भारताला जागतिक प्रायव्हेट इक्विटी आणि प्रायव्हेट क्रेडिकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यामुळे भारतीय कंपन्यांना भांडवल सहज उपल्बध होई. नव्या उद्योगांना चालना मिळेल, आणि रोजगारनिर्मिती होईल असे त्यांनी म्हटले. याचा थेट परिणाम आर्थिक वाढीवर होईल असे रुबेनस्टाईन यांनी सांगितले.
दरम्यान रुबेनस्टाईन यांनी अमेरिका आणि भारत संबंधाबद्दल कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की दोन्ही देशांतील संबंध सकारात्मक आहेत.
‘हो, मी हुकूमशहा’! दावोसमध्ये ट्रम्प यांनी असं काय म्हटलं? ज्यामुळे जागतिक राजकारणात उठलं वादळ