
Middle East Crisis Oman Restricts Private Jet Flights Amid Security Concerns
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हवाई उड्डाणे रद्द झाल्याने ओमानच्या मस्कट आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली आहे. अनेक लोक खासगी जेट विमानांच्या मदतीने जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात आहे. मात्र यामुळे गर्दी वाढत असल्याने ओमानने खाजही विमानांच्या उड्डाणांवर कडक निर्बंध लादले आहेत. श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती सुरक्षित ठिकाणी पळ काढण्यासाठी खासगी विमानांचा वापर करत होते आता मात्र ओमानच्या निर्णयामुळे त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
ओमानच्या आंतरराष्ट्रीय विमातळाने सुरक्षेचा हवाला देत सर्व चार्टर विमान कंपन्यांना ई-मेलद्वारे सूचना दिल्या आहेत. विमानतळावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यावसायिक उड्डाणांना प्राधान्य देण्यासाठी सध्या केवळ ‘सीझनल शेड्युल्ड’ विमानांनाच परवानगी दिली जाईल असे ओमानने म्हटले आहे. तसेच सर्व खासगी स्लॉट्स रद्द करण्यात आले आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत. तर श्रीमंत लोक लाखो रुपये खर्च करुन खासगी विमानांनी सुरक्षित देशात जात होते. तर दुसरीकडे सामान्यांना तास न तास फ्लाइट मिळण्याची वाट पहावी लागत आहे. मात्र आता श्रीमंतासाठीही हीच परिस्थिती आहे.
सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराण अमेरिका युद्धाने अनेक आखाती देश युद्धात ओढले गेले आहेत. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. हल्ल्यांमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. सलग १० व्या दिवशीही युद्ध सुरु आहे. याच वेळी इराणच्या माजी सुप्रीम लीडर अली अयातुल्ली खामेनेई यांच्या मुलाची मोजतबा खामेनेईंची नवे सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांचाही खात्मा करु अशी धमकी अमेरिका-इस्रायलने दिली आहे.
Ans: मध्यपूर्वेतील अमेरिका इराणमधील वाढत्या तणावामुळे आणि हवाई क्षेत्रातील सुरक्षेच्या धोक्यांमुळे मस्कट आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ओमानने प्रायव्हेट जेट उड्डाणांवर तात्पुरत्या मर्यादा घातल्या.
Ans: आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकले आहेत. अनेक श्रीमंत लोक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी प्रायव्हेट जेटचा वापर करत होते, परंतु नव्या नियमांमुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.