Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : BRICS मध्ये फूट? इराणवरील हल्ल्याने सदस्य देश भिडले; भारत नेमका कोणाच्या बाजूने?

Middle East War : मध्यपूर्वेत सलग १० व्या दिवशीही इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध सुरु असून यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धामुले ब्रिक्स देशांमध्येही फूट पडताना दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 08:20 PM
Brics countries fighting over Iran US War

Brics countries fighting over Iran US War

Follow Us
Close
Follow Us:
  • BRICS मध्ये फूट?
  • इराणवरील हल्ल्याने १० देश भिडले
  • भारत नेमका कोणाच्या बाजूने?
BRICS internal conflict : सध्या पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर BRICS आंतरराष्ट्रीय संघटनेतही वाद पेटाल आहे. इराणवरील हल्ल्यावरुन १० देशांमध्ये मतभेद निर्माण झाला आहे. इराण हा ब्रिक्स संघटनेचा भाग नाही परंतु यावर या संघटनेतील सदस्य देशांनी विविध भूमिका घेतली आहे. या संघटनेतू भू-राजकीय हितसंबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत.

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

कोणत्या देशाने नेमकी काय भूमिका घेतली ?

  • ब्राझील : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्समधील प्रत्येक देशाने विविध आणि स्वतंत्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ब्राझील अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. तसेच याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघघन म्हटले आहे.
  • दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी मध्यपूर्वेतील युद्धावर प्रतिक्रिया देत तातडीने युद्धविरामाची मागणी केली आहे. तसेच हा संघर्ष मध्यपूर्वेच्या पलीकडे पोहोचू नये अशीही चेतावणी दिली आहे.
  • रशिया : तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादामिर पुतिन (Vladimir Putin) यांनी देखील इराणवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका-इस्रायलच्या कारवाईला संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांवर पूर्वनियोजित हल्ला संबोधले आहे.
  • चीन : चीनने देखील मध्यपूर्वेतील घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इराणवरील हल्ल्यांचा निषेध करत यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढू शकते अशी चिंता व्यक्त केली.
  • भारत : ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या भारताने मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत सर्व पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने वाद सोडवावा असे म्हटले आहे. भारताने कोणत्याही एका देशाच्या बाजूने निषेध नोंदवलेला नाही.
  • तर या संघटनेतील आखाती देश सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीवर इराणने हल्ले केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

भारताची तटस्थ भूमिका घेण्याचे कारण

भारताच्या समतोल भूमिकेमागे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. इस्रायल आणि अमेरिकेशी भारताचे संबंध मजबूत आहेत. तसेच इराणही भारताचा मित्र राष्ट्र आहे. इराणसोबत भारताचे उर्जा आणि व्यापार क्षेत्रात मोठा संबंध आहे. अशा परिस्थिती भारताची संतुलित भूमिका ठेवली आहे.

BRICS सुरुवात २००९ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला या संघटनेत ब्राझील, रशिया(Russia), भारत, चीन (China) आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश होते. २०२४ नंतर यामध्ये इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश झाला. सध्या इराणवरील हल्ल्यामुळे या देशांमध्ये मतभेद निर्माण असल्याचे दिसत आहे. भविष्यात या मतभेदांमुळे गटाच्या एकजुटतेवर जागतिक राजकारणातील प्रभावावरही परिणाम होऊ शकतो.

Middle East War : युद्धामुळे श्रीमंतांची पळता भुई! ओमानने खाजगी विमानांवर घातली बंदी

Web Title: Middle east war rift in brics member nations clash over attack on iran where does india stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Brazil
  • Brics Council
  • China
  • Iran News
  • Russia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा
1

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?
2

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?

हॉटेल Hilton खरोखरच ‘शापित’? आधी रोनाल्ड रीगन आता Donald Trump! राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, परिणाम काय होणार?
3

हॉटेल Hilton खरोखरच ‘शापित’? आधी रोनाल्ड रीगन आता Donald Trump! राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, परिणाम काय होणार?

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
4

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.