फोटो सौजन्य सोशल मीडिया
यात इराण सुरवातीला एकटाच या सगळ्यांशी लढत असताना लेबनॉन वर इस्रायलने हल्ले करायला सुरवात केली . तेव्हा येमेन मधील हुथींना इराणला मदत करण्यासाठी युद्धात उतरावे लागले . त्यांनी लाल समुद्र बंद करून आखाती देशांची तेल वाहतुकीची पंचायत केली . याला पर्याय म्हणून सौदीने पाइपलाइनद्वारे मोठ्या प्रमाणात तेल विक्री सुरु केली त्यावर हुथींनी पाइपलाइनवर हल्ला करून तिला थोडी मोडकळीला आणली .
त्यानंतर सौदी आणि हुथींचा चॅप्टर सुरु झाला . तसा सौदी आणि येमेन मधील हुथीं यांचे वाद खूप जुने आहेत . पण यासगळ्या मुळे जगाला सर्वात जास्त तेल पुरवठा करणाऱ्या आखाती देशाच्या तेल कंपन्यांवर हल्ले झाल्यामुळे तेलाचे संकट हे अधिक गडध झाले . आणि याचा परिणाम युद्धात सामील नसलेल्या देशांना सुद्धा भोगायला लागायला सुरवात झाली आहे .
२०१४ मध्ये हुथींनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर केले . कारण सत्तेत बसलेले सरकार हे सौदी धार्जिणे होते म्हणून . त्यानंतर २०१५ मध्ये सौदी अरेबियाने लष्करी हस्तक्षेप केला . आपल्या सीमेवर नियंत्रण नको होते . आणि इराणचा प्रभाव वाढण्याचीही त्यांना भीती होती . हुथींना इराणकडून राजकीय आणीन लष्करी पाठबळ मिळते , तर सौदीने येमेनच्या आंतराराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा दिला .
त्यामुळे हा संघर्ष येमेनच्या अंतर्गत गृहयुद्ध अधिक सौदी इराणमधील प्रादेशिक स्पर्धा असा बनला .सौदी आणि आखातातील लोक हुथींना कनिष्ठ आदिवासी लोक मानतात . त्यामुळे हा संघर्ष अधिकच पेटत राहिला आहे . २०२२ मध्ये खूप प्रयत्नांनी UN च्या मध्यस्थीने युद्धविराम झाला होता .
पण कायमस्वरूपी राजकीय तोडगा निघाला नाही . आता २०२६ मध्ये मध्य पूर्वेत पुन्हा भडका उडाला असून तणाव वाढून कैक निष्पाप नागरिकांना आपला संसार जिथे होता तिथे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे .
आधीच युद्धाच्या प्रकरणामुळे जगभरात तेलाच्या किमती या वाढल्या आहेत . कारण होर्मूझ अजूनही बंद असल्याने जगाची २० टक्के तेलवाहतूक ठप्प आहे . त्यात लाल समुद्रातील हुथींच्या कब्ज्यामुळे तेथील सुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे .
आणि अशातच जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर म्हणजे अरामकोवर हल्ला झाल्यावर किंवा तिच्या वितरण सुविधेला मोठे नुकसान झाल्यास जागतिक बाजारात पुरवठ्याबाबत चिंता वाढू शकते . त्यामुळे कच्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे .
सौदीच्या तेल पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ल्याचा धोका निर्माण झाल्यास गुंतवणूकदार आणि तेल व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढू शकते . खासकरून Red Sea आणि Bab al Mandeb मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरतो . हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे .






