X outages Elon Musk blames Ukrainian forces after Massive Cyberattack Hits X
वॉशिंग्टन: अमेरिकन उद्योगपती आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी एक्सवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला आहे आणि यासाठी यूक्रेन जबाबदार आहे. कारण हल्ल्यासाठी यूक्रेनचा IP ॲड्रेस वापरण्यात आला आहे. सोमवारी (10 मार्च) एक्स प्लॅटफॉर्म अनेक वेळा डाउन झाले होते. काही काळासाठी सेवा सुरळीत करण्यात आली, मात्र पुन्हा एक्स क्रॅश झाले आहे.
सायबर हल्ल्यामागे कोण?
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एलॉन मस्क यांनी म्हटले की, “नक्की काय झाले आम्हाला माहिती नाही, पण एक्सच्या सिसिस्टमला ठप्प करण्यासाठी यूक्रेनमधील IP अड्रेस वापरण्यात आला आहे.” त्यांनी असेही म्हटले की, एक्सची सेवा पूर्णपण सुरळीत आहे. मात्र या ङल्ल्यामागे एखाद्या मोठ्या गटाचा हात असू शकतो किंवा एखादा देशाचाही यामागे हात असू शकतो.सध्या याचा तपास सुरु असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
मस्क यांची झेलेन्स्कींवर टीका
एलॉन मस्क यांनी अलीकडचे यूक्रेन सरकार आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना स्टारलिंक सेवा बंद करण्याची धमकी दिली होती. शिवाय त्यांनी अनेकवेळा झेलेन्स्की यांच्यावरही टिका केली होती. त्यांनी म्हटले होते की,”स्टारलिंकशिवाय यूक्रेनचे संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होईल आणि संरक्षण विभाग कोसळेल. शिवाय मस्क यांनी झेलेन्स्की यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहेत.त्यांनी झेलेन्स्की सैनिकांच्या मृतदेहांवरुन पैसे कमवत असल्याचे म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी यापूर्वीही अनेकदा झेलेन्स्कींवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी यूक्रेनच्या निवडणुकांवर टीका केली आहे. मस्क यांनी म्हटले की, धेलेन्स्की निवडणुकीत हारतील हे त्यांना आधीच माहीत होते. यामुळे त्यांनी निवडणुका रद्द केल्या. यूक्रेनचे नागरिक त्यांचा तिरस्कार करतात. त्यांनी 2022 च्या ‘Vouge’ मॅगझिनच्या कव्हर फोटोवरही टीका केली आहे. या फोटोमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीचा हात धरुन उभे होते, यावेळी यूक्रेनचे सैनिक युद्धभूमीवर मृत्युमुखी पडत होते.
यूक्रेनचा एक्सवर सायबर हल्ला
एलॉन मस्क यांच्या या टीकांच्या पार्श्वभूमीवरच एक्सवर हे हल्ले होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, यूक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या झेलेन्स्की सौदी अरेबियात यूक्रेनच्या शांततेसाठी अमेरिकन आणि रशियन अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीला गेले आहे. दरम्यान या बैठकीपूर्वीच रशियावर यूक्रेनच्या सैन्याने मोठा हल्ला केला आहे. यामुळे झेलेन्स्की यांच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.