Yemen’s Houthis launched Missiles on Israel’s Ben Gurion airport
जेरुसेलम: हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. हा हल्ला रविवारी (04 मे ) करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीन रुग्णालयात दाखळ करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याहल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले आहे.
दरम्यान नेतन्याहू यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. तसेच संध्याकाळी सुरक्षा रक्षाकांची एक बैठकही होणार आहेत. या बैठकीमध्ये हुथीबंडखोरांविरोधातील कारवाईवर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसा, येमेनमधील बेन गुरियन विमानतळावर हुथी दहशतवाद्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. हा हल्ला थांबवण्यात इस्रायली सुरक्षा दल अयशस्वी ठरले. यामुळे क्षेपणास्त्रे बेन गुरियन विमानतळावर पडले. हल्ल्यापूर्वी विमानतळावर एक विमानाचे लॅंडिग आणि एकाचे टेक-ऑफ होणार होणार होते. परंतु हल्ल्याची माहिती मिळताच हे थांबवण्यात आले.
हुथींच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या माऱ्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि इतर उच्चस्तरिय अधिकऱ्यांशी बैठक घेतली. यानंतर संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत येमेनच्या हुथींवर थेट हल्ल्याचा इस्रायल आढावा घेणार आहे. तसेच नेतन्याहू सुरक्षा मंत्रीमंडाची वैयक्तिक रित्या देखील भेट घेणार आहेत. गाझातील लष्करी कारवाई आणि हुखींचे हल्ले तसेच सीरियातील कारवाईबद्दल या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे.
दरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बेन गुरियन हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी हुथींवर संताप व्यक्त केला असून सात वेळा हल्ल्याची धमकी दिली आहे. काट्झ यांनी म्हटले आहे की, ‘जो कोणी आमच्यावर हल्ला करेल, त्यांना आम्ही सोजणार नाही. आम्ही त्यांच्यावर सातवेळा हल्ले करु.’
सध्या अमेरिकेने येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली आहे. अमेरिका हुथींच्या लष्करी ठिकाणांना लक्ष करून संपूर्णपणे उदध्वस्त करत आहे. अमेरिकेच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवरच येमेनमधील हुथींवरील हल्ले बंद केले होते. परंतु हुथींच्या हल्ल्याने बेंजामिन नेतन्याहू संतप्त झाले आहेत. त्यांनी या हल्ल्यांना लवकरच उत्तर मिळेल असे म्हटले आहे.
याच दरम्यान येमेनच्या डिप्लोमॅटिक सरकारचे पंतप्रधान अहमद अवाद बिन मुबारक यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता अमेरिका हुथींच्या इस्रायलवरील हल्ल्यावर काय कारवाई करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इस्रायल आणि अमेरिकेचे संबंध अधिक चागंले आहे.