अमेरिकेची चिंता वाढली? हूथी विद्रोहांवरील हल्ल्यानंतर येमेनच्या पंतप्रधानांचा राजीनामा; प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
येमेन: येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरवरील डिप्लोमॅटिक सरकारचे पंतप्रधान अमहमद अवद विबन मुबारक यांनी शनिवारी (03 मे) राजीनामा दिला आहे. हा राजीनामा अशा वेळी देण्यात आला आहे, जेव्हा अमेरिका येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई करत आहे. अमेरिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अहमद यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा जाहीर केला आणि राष्ट्रपती परिषदेचे प्रमुख रशाद अल-अलीमी यांना याची माहिती दिली.
अहमद अवद बिन मुबारक यांना 2024 मध्ये येमेनच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आली होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी म्हटले की, मी राज्य संस्थांमध्ये सुधारणा करण्यास आणि मंत्रिमंडळात आवश्यक बदल करण्यास असमर्थ आहे. दरम्यान त्यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रपती परिषदेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
येमेनचे पंतप्रधान मुबारक आणि कौन्सिलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरु होता. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे म्हटले जात आहे. सरवाकच्या आर्थित आव्हानांसाठी त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. वाढती महागई आणि वारंवार वीज कपातींसाठी मुबारक यांच्या प्रशासनाला जबाबदार धरले जात होते.
2014 मध्ये येमेनमध्ये यादवी युद्ध सुरु झाले. त्यानंतर इराण समर्थित हुथी बंडखोरांनी येमेनेच्या अनेक भागांवर ताबा मिळवला होता. यामुळे पूर्वीचे सौदी अरेबियाचे डिप्लोमॅटिक सरकार निर्वासित करण्यात आले. सौदीच्या नेतृत्वाखाली आणि नंतर अमेरिकेच्या पाठिंब्याने आंतरराष्ट्रीय युतींनी हुथी दहशतवाद्यांविरोदात युद्ध सुरु केले. यानंतर हुथींविरोधात मोठे युद्ध सुरु झाले. या युद्धामुळे येमेनमध्ये प्रॉक्सी युद्धाची वाढ झाली. याचा सामाना येमेन आजही करत आहे.
त्यानंतर 2022 मध्ये हुथीविरोधकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने सात सदस्यीय राष्ट्रपती परिषदेची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही परिषदत दोन गटांमध्ये विभागली गेले. एक गट संयुक्त अरब अमिरातीला जोडला गेला आणि दुसरा गट सौदी अरेबियाला जोडला गेला.
अमेरिकेने हुथी बंडखोरांना संपवण्यासाठी पुन्हा एकदा युद्ध सुरु केले आहे. अमेरिकेने हुथी विद्रोह्यांवर तीव्र लष्करी कारवाई सुरु केली आहे. याच दरम्यान पंतप्रधान अहमद अवद बिन मुबारक यांनी राजनीमा दिला आहे. यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. मुबारक यांच्या राजीनाम्यानंतर स्थानिक प्रशासन पुनर्स्थापित करणे महत्वाचे आहे. तरच अमेरिका हुथींविरोधी लष्करी कारवाई करु शकते.