
Yunus has no control over Bangladesh government, says Sheikh Hasina
Bangladesh news in Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकाराणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी युनूस यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. हसीना यांनी म्हटले आहे की, युनूस यांनी त्यांच्या सरकारवरील नियंत्रण गमावले आहे. सध्या युनूसच्या राजवटीत कट्टरपंथीं शक्तीं राज करत असल्याचा दावा हसीना यांनी केला आहे.
बांगलादेशची धुरा डोनाल्ड ट्रम्पच्या हाती? आंतरराष्ट्रीय राजकारणात उडाली एकच खळबळ
द वीक या मासिकेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शेख हसीना यांनी म्हटले की, अंतरिम सरकारचे मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांचे आता सरकारवर नियंत्रण राहिलेले नाही, ते केवळ नावापूरते मर्यादित आहे. सध्या त्यांच्या राजवटीखाली कट्टरपंथी शक्ती आपली विचारसरणी देशात पसरवत असल्याचा आरोप हसीना यांनी दावा केला की, हिज्बुत-तहरीर यांसारखे अतेरिकेट गट लोकांवर अत्याचर करत आहे.
त्यांनी सांगितले की, २०१६ दरम्यान होलि आर्टिसन कॅफेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले गट सध्या सरकार चालवत आहे. या गटांना नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्या सरकारने केला होता, असेही हसीना यांनी सांगितले.
ऑगस्ट २०२४ मध्ये हसीना यांचे सरकार पडले. तेव्हापासून त्या भारतात आश्रय घेत आहेत. त्यांनी दावा केला की, बांगलादेशात खून, लैंगिक अत्याचार, लूटमार, जाळपोळ आणि चोरी हे गुन्हे आता सामान्य आहेत. त्यांनी दावा केला की, युनूस सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या आठड्यापासून अल्पसंख्यांक आणि स्थानिकांवर हल्ले सुरु झाले होते. आजही त्यांच्यावर हल्ले होत आहेच. अनेक मंदिरे, घरे बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केली जात आहेत.
हसीना यांनी आणखी एक दावा केला की, त्यांच्या अवामी लीगवर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्या समर्थकांचा मतदानाचा अधिकारही काढून घेण्यात आला आहे. हसीना यांनी युनूस यांनी संविधानांच्या तरतूदींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार सार्वत्रिक निवडणुका
बांगलादेशात पुढील वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूकी घेण्यात येणार आहे. परंतु यापूर्वीच देशाच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. सध्या शेख हसीना यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. याच वेळी बाह्यहस्तेक्षाचा आरोपही केला जात आहे. यामुळे फेब्रुवारीत निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकतेने पार पडणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष बांगलादेशच्या अंतर्गत घडामोडींकडे लागले आहे.
ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप
Ans: शेखी हसीना यांच्या मते, सध्या युनूस यांनी बांगलादेश सरकारवरील नियंत्रण गमावले असून, त्यांच्या राजवटीत कट्टरपंथी लोक आपली विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ans: हसीना यांच्या मते, मोहम्मद युनूस सरकारने असे काही आदेश दिले आहेत, ज्यामुळे बांगलादेशच्या संविधानांतील तरतूदींचे उल्लंघन होत आहे.
Ans: बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.