Zelensky expressed displeasure over ver Ukraine's exclusion from ceasefire talks
कीव: रशिया-युक्रेन यांच्या गेल्या तीन वर्षापासून युद्ध सुरु असून संघर्षी दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यामुळे या दीर्घकालीन युद्धाचा शेवट करण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या राजनियकांची सध्या सौदी अरेबियात चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चेत युक्रेनचा समावेश नसल्याने अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या रियाधमध्ये या शांतता चर्चेचा पहिला टप्पा सुरु आहे.
याच वेळी क्रेमलिनने पुष्टी केली आहे की, गरज भासल्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी देखील भेटायला तयार असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनला चर्चेपासून दूर ठेवले
सौदी अरेबियाची राजधीनी रियाधमध्ये सुरु असलेल्या रशिया-युक्रेन शांतता चर्चेत युक्रेनचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “युक्रेनच्या सहभागाशिवाय कोणतीही चर्चा किंवा करार आम्ही मान्य करणार नाही.”
झेसेन्स्की देखील सौदी अरेबियाला जाणार
युक्रेनचे अध्यक्ष झेसेन्स्की देखील सौदी अरेबियाला जाणार आहेत, मात्र, त्यांच्या भेटीचे वेळापत्रक आहेत, मात्र त्यांच्या भेटीचे वेळापत्रक रशियन आणि अमेरिकन राजनयिकांच्या बैठकीनंतरचे आहे. झेलेनस्की यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियात असताना अध्यक्ष झेलेन्स्की कोणत्याही रशियन किंवा अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटणार नाहीत. ते आपल्या UAE आणि तुर्कीच्या पूर्वनियोजित भेटीपूर्वी सौदी अरेबियात थांबणार आहेत.
पुतिन आणि झेलेन्स्कींबरोबर ट्रम्प यांची चर्चा
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धावर शांतता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की या दोघांशी फोनवरून संवाद साधला. मात्र, ट्रम्प यांनी आधी पुतिनशी चर्चा केल्यामुळे युक्रेनमध्ये संताप उसळला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनला युद्धविरामासाठी अमेरिकेला 50 टक्के मिनरल्स देण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि झेलेन्स्की यांनी यावर आपली सहमती देखील दर्शवली होती.
चीनच्या तज्ज्ञांचा सल्ला
याच दरम्यान चीनचे जी कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ झोउ बो यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी युक्रेनला रशिया युद्धविराम करार चिकवून ठेवण्याठी चीन मदत करु शकतो असे म्हटले आहे. यासाठी चीन सैन्य युक्रेनमध्ये तैनात करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
तसेच त्यांनी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.झोउ बो यांनी झेलेन्स्कींना सुचवले आहे, की चीन आणि भारतासारखे गैर-नाटो देश एकत्र येऊन युक्रेनमध्ये शांतता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकताता. त्यांच्या या विधानानने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.