Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरात बनवल्या गेल्या होत्या फक्त १६ गाड्या! ही आहे FJ6 हिरव्या रंगात खुलून दिसणारी १९७० ची Plymouth GTX! जाणून घ्या सर्वकाही

१९७० च्या दुर्मिळ 'सॅसी ग्रास ग्रीन' रंगातील प्लायमाउथ जीटीएक्स या क्लासिक मसल कारची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. जगभरात या रंगात बनवलेल्या अवघ्या १६ गाड्यांपैकी ही एक कार असून, यात ७.२-लिटर V8 इंजिन व मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. रिस्टोरेशन केलेली ही कार सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 30, 2026 | 07:30 AM
जगभरात बनवल्या गेल्या होत्या फक्त १६ गाड्या! ही आहे FJ6 हिरव्या रंगात खुलून दिसणारी १९७० ची Plymouth GTX! जाणून घ्या सर्वकाही
Follow Us
Follow Us:
  • दुर्मिळ निर्मिती: सॅसी ग्रास ग्रीन रंगात बनवलेल्या जगातील अवघ्या १६ कार्सपैकी ही एक कार आहे.
  • दमदार इंजिन: या कारमध्ये ३७५ हॉर्सपॉवर क्षमतेचे दमदार ७.२-लिटर V8 इंजिन देण्यात आले आहे.
  • उत्कृष्ट स्थिती: रोटिसरी रिस्टोर केलेली ही क्लासिक कार सध्या ९९,५०० डॉलर्सना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

१९६५ मध्ये प्लायमाउथ कंपनीने ‘सॅटेलाइट’ ही लक्झरी कार लाँच केली होती, तरी त्यांना आणखी एका प्रीमियम आणि पॉवरफुल मसल कारची गरज भासत होती. याच विचारातून १९६७ मध्ये Plymouth GTX बाजारात आली, ज्याला पुढे “द जेंटलमेन्स मसल कार” म्हणून ओळखले जाऊ लागले.

सॅटेलाइटप्रमाणेच जीटीएक्ससुद्धा फक्त टू-डोअर बॉडी स्टाइल पर्यायामध्ये उपलब्ध होती आणि यात स्टँडर्ड व्ही-८ इंजिन देण्यात आले होते. तरीही या दोन्ही मोपार कार्समध्ये मोठा फरक होता. सॅटेलाइटमध्ये लहान आकाराचे व्ही-८ इंजिन असायचे, तर जीटीएक्समध्ये तब्बल ७.२-लिटरचे (४४० क्युबिक इंच) अवाढव्य बिग-ब्लॉक इंजिन देण्यात आले होते.

मात्र, अधिक किंमतीमुळे या कारची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली. पुढे १९७१ मध्ये क्रायस्लरने हाय-कंप्रेशन इंजिन्स टप्प्याटप्प्याने बंद केल्यावर जीटीएक्स कारचे उत्पादनही थांबवण्यात आले. पाच वर्षांच्या कालावधीत या कारचे जवळपास ४४,००० युनिट्स विकले गेले. तुलना करायची झाल्यास, प्लायमाउथने एकट्या १९६८ मध्येच ‘रोड रनर’ या मॉडेलच्या तब्बल ४४,००० गाड्या विकल्या होत्या.

दमदार आणि स्पोर्टी लुक आवडतो? २५० सीसीच्या आतील या आहेत टॉप ५ बाईक्स! त्वरा करा आत्ताच पाहून घ्या

रंगाची खास वैशिष्ट्ये आणि दुर्मिळता

१९७१ ची जीटीएक्स ही या सीरिजमधील सर्वात दुर्मिळ कार मानली जाते, ज्याचे फक्त २,९४२ युनिट्स विकले गेले होते. त्यापाठोपाठ १९७० च्या मॉडेलचा क्रमांक लागतो, ज्याचे ७,७४० युनिट्स तयार झाले होते.

सध्या चर्चेत असलेली हिरव्या रंगाची ‘हार्डटॉप’ कार या ७,७४० गाड्यांपैकीच एक आहे, पण तिच्या विशिष्ट रंगामुळे ती अत्यंत खास ठरते. ही कार ‘सॅसी ग्रास ग्रीन’ या रंगात असेंबल झाली होती. १९६९ ते १९७३ दरम्यान ऑफर केलेल्या १० हाय-इम्पॅक्ट रंगांपैकी हा एक लोकप्रिय रंग होता.

१९७० मध्ये लाँच केलेला आणि १९७१ नंतर बंद झालेला हा रंग डॉज मॉडेल्सवर ‘ग्रीन गो’ नावानेही ओळखला जायचा. ‘अमेरिकन स्टील क्लासिक कार्स’नुसार, या विशिष्ट रंगात तयार झालेल्या केवळ १६ जीटीएक्स गाड्यांपैकी ही एक आहे.

कारची टेक्निकल वैशिष्ट्ये आणि इंजिन

  • इंजिन: ७.२-लिटर (४४० क्युबिक इंच) V8 इंजिन (U-code)
  • पॉवर: ३७५ हॉर्सपॉवर (HP)
  • गिअरबॉक्स: ४-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (जे नेहमीच्या ३-स्पीड टॉर्कफ्लिट ऑटोमॅटिकपेक्षा खूप दुर्मिळ आहे).
  • उत्पादनाचे आकडे: या इंजिन आणि गिअरबॉक्सच्या कॉम्बिनेशनसह फक्त १,४७१ गाड्या तयार करण्यात आल्या होत्या.
ही क्लासिक कार अतिशय उत्तम स्थितीत ‘रोटिसरी रिस्टोअर’ करण्यात आली असून तिच्या आतील आणि बाहेरील लुकमध्ये मूळ सौंदर्य टिकवून ठेवण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक ‘एयर ग्रॅबर’ हूड देण्यात आला आहे, तर इंजिन आणि ट्रान्समिशन पूर्णपणे नंबर्स-मॅचिंग आहेत.

कारच्या हूडखाली एक छोटासा सरप्राइज बदल करण्यात आला आहे—यामध्ये ३x२-बॅरल कार्बोरेटर सेटअप बसवला आहे. त्यामुळे ही कार आता ‘सिक्स-बॅरल’ कारसारखी परफॉर्म करते.

Royal Enfield Interceptor 650 vs Continental GT 650: एकाच इंजिनचे दोन वेगवेगळे अवतार! कोण आहे कोणापेक्षा वरचढ?

१९७० मध्ये जीटीएक्सवर सादर करण्यात आलेले ४४० सिक्स-बॅरल इंजिन ३९० हॉर्सपॉवरची ताकद द्यायचे. हे इंजिन नेहमीच्या ४४० इंजिनपेक्षा खूप दुर्मिळ होते, ज्याचे फक्त ६७८ युनिट्स बनवले गेले होते आणि त्यापैकी केवळ ३५० गाड्यांमध्ये ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स होता.

किंमत आणि निष्कर्ष

क्लासिक मोपार कार्समध्ये कोणतेही बदल केलेले सहसा कार प्रेमींना आवडत नाहीत, तरीही या जीटीएक्समधील अपडेट त्या काळाशी सुसंगत असाच आहे. विशेष म्हणजे, इच्छा असल्यास हे बदल काढून पुन्हा कंपनीच्या ओरिजिनल स्पेसिफिकेशन्सवर कार सहज आणता येते.

तुम्हाला ही दुर्मिळ कार तिच्या सध्याच्या रुपात चालवायची असेल किंवा मूळ स्थितीत न्यायची असेल, तर यासाठी ९९,५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास सुमारे ८३ लाख भारतीय रुपये मोजावे लागतील. आहे न मोठी गमतीची गोष्ट?

Web Title: 1970 plymouth gtx fj6 sassy grass green rare muscle car auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.