फोटो सौजन्य: @suzukicycles (X.com)
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये दुचाकी विकल्या जातात. यात अॅडव्हेंचर बाईक्सला सुद्धा दमदार मागणी मिळताना दिसत आहे. अशातच आता सुझुकीने आपली नवीन लोकप्रिय अॅडव्हेंचर टूरर बाईक लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
सुझुकी मोटरसायकलने त्यांची लोकप्रिय अॅडव्हेंचर टूरर बाईक 2025 सुझुकी व्ही-स्ट्रॉम 800DE भारतात अधिक अपडेटेड व्हर्जनसह सादर केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये इंजिनचे अपडेट्स करण्यात आले असून, ते आता लेटेस्ट OBD-2B उत्सर्जन मानकांशी सुसंगत आहे. इंजिनच्या तांत्रिक सुधारणा सोबतच, या बाईकला आकर्षक कलर ऑप्शन्स आणि नव्या फीचर्ससह आणले आहे. या अपडेट्समुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि आकर्षक झाली आहे.
या बाईकला आता तीन नवीन आणि आकर्षक रंग मिळाले आहेत:
हे रंग पर्याय बाईकला अधिक स्पोर्टी आणि डॅशिंग लूक देतात.
ही बाईक 776 सीसी पॅरलल-ट्विन DOHC इंजिन वापरते, ज्यामध्ये 270-डिग्री क्रँकशाफ्ट डिझाइन देण्यात आले आहे. यामुळे राइड अधिक चांगली होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे इंजिन आता OBD-2B उत्सर्जन मानकांनुसार अपडेट करण्यात आले असून, त्यामुळे ही बाईक अधिक पर्यावरणपूरक बनली आहे.
V-Strom 800DE ही एका कडक स्टील फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. यामुळे ही बाईक चालवताना उत्कृष्ट हँडलिंग मिळते. यात लांब व्हीलबेस, हाय ग्राउंड क्लीयरन्स आणि रुंद हँडलबार आहे. त्याच्या सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात Hitachi Astemo (SHOWA) इनव्हर्टेड फ्रंट फोर्क आणि Hitachi Astemo (SHOWA) मोनो-शॉक रिअर सस्पेंशन आहे. यात मॅन्युअली अॅडजस्टेबल स्प्रिंग प्रीलोडची सुविधा आहे. यात 21-इंच अॅल्युमिनियम फ्रंट रिम, वायर-स्पोक व्हील्स आणि डनलॉप ट्रेडमॅक्स मिक्सटूर अॅडव्हेंचर टायर्स आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात 20-लिटर फ्युएल टॅंक देखील आहे.
V-Strom 800DE अनेक इलेक्ट्रॉनिक रायडर एड्ससह येते, जे रायडिंग अनुभव आरामदायक बनवते. यात तीन वेगवेगळे रायडिंग मोड आहेत. त्यात एक विशेष ‘ग्रेव्हल मोड’ देखील समाविष्ट आहे. यात राइड-बाय-वायर इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल देण्यात आला आहे. बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्ट सिस्टम, ABS, लो RPM असिस्ट, इझी स्टार्ट सिस्टम सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
अपडेटेड Suzuki V-Strom 800DE भारतात तब्बल 10,30,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. तुम्ही ही दमदार बाईक सुझुकीच्या बाईक डीलरशिपमधून खरेदी करू शकता.