(फोटो सौजन्य-AI एआय)
नवीन डिझाइनमुळे SUV दिसते आणखी आकर्षक
फेसलिफ्टमध्ये एलिव्हेटच्या एकूण बॉडी डिझाइनमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही. पण फ्रंट प्रोफाइलला नव्या ग्रिलमुळे वेगळा लूक मिळतो. मोठी ब्लॅक ग्रिल, नवीन हॉरिझॉन्टल LED लाइटिंग सिग्नेचर आणि अपडेटेड फ्रंट बंपर देण्यात आला आहे. यासोबत नवीन अलॉय व्हील डिझाइनही मिळते. त्यामुळे SUVचा लूक आधीपेक्षा जास्त प्रीमियम वाटतो.
360-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स
नवीन एलिव्हेटमधील सर्वात महत्त्वाच्या अपडेट्सपैकी एक म्हणजे फॅक्टरी-फिटेड 360-डिग्री कॅमेरा. हा कॅमेरा सेंट्रल टचस्क्रीनवर गाडीच्या आजूबाजूचे वेगवेगळे व्ह्यू दाखवतो. टॉप व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स आणि 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीटही मिळते. यामुळे दैनंदिन ड्रायव्हिंगसोबत लांब प्रवासातही कस्टमरना जास्त आराम मिळण्याची अपेक्षा आहे.
इंजिनमध्ये बदल नाही
होंडा एलिव्हेट फेसलिफ्टमध्ये आधीचेच 1.5L naturally aspirated पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन 121 hp पॉवर आणि 145 Nm टॉर्क तयार करते. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिकचे ऑप्शन मिळतात. होंडाने यामध्ये City प्रमाणे स्ट्राँग हायब्रिड टेक्नोलॉजी दिलेली नाही.
Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
सेफ्टीमध्येही मजबूत पॅकेज
एलिव्हेटमध्ये 458 लिटरची बूट कॅपसिटी आणि 220 mm ग्राउंड क्लीअरन्स कायम आहे. Honda Sensing पॅकेजमुळे टॉप व्हेरिएंटमध्ये Level 2 ADAS फीचर्स मिळतात. यात Adaptive Cruise Control, Collision Mitigation Braking आणि Lane Keep Assist यांचा समावेश आहे. याशिवाय 6 एअरबॅग्स, EPB आणि CVT व्हेरिएंटमध्ये रियर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. नवीन ZX+ मुळे एलिव्हेटची टॉप किंमत ₹16.80 लाखांपर्यंत पोहोचली असून तिची टक्कर हुंडाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगूनशी राहणार आहे.






