फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजरात नेहमीपासूनच कार्सना जोरदार मागणी मिळत आहे. त्यामुळेच तर मार्केटमध्ये अनेक विदेशी ऑटो कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. ग्राहक देखील या कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. अशातच, आता भारतात स्कोडाने 25 वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्ताने कंपनीने त्यांच्या परवडणाऱ्या Skoda Kylaq ची नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे. मात्र, याशिवाय kushaq आणि slavia चे खास व्हेरिएंट देखील लाँच करण्यात आले आहेत.
Kylaq च्या खास व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, ती कारच्या सिग्नेचर + आणि प्रेस्टिज 2 मॉडेल्ससह आली आहे. ती थोडी वेगळी बनवण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. महत्वाचा गोष्ट म्हणजे प्रत्येक वाहनाचा खास व्हेरिएंट फक्त 500 लोक खरेदी करू शकतील.
160 किमी रेंज आणि 56 लिटर स्टोरेज, फक्त 10 हजारात बुक करता येणार ‘हा’ इलेक्ट्रिक स्कूटर
Kylaq चे नियमित मॉडेल सध्या 11 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत ₹8.25 लाख ते ₹13.99 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. विशेष व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, सिग्नेचर + ची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे आणि प्रेस्टिजची एक्स-शोरूम किंमत 12.89 लाख रुपये आहे. त्याच्या नवीन विशेष व्हर्जनमध्ये स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत डिझाइन आणि फीचर्समध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. या लिमिटेड एडिशन कार्समध्ये मोफत ॲक्सेसरीज किट असेल, ज्यामध्ये 360-डिग्री कॅमेरा सेटअप, पुडल लॅम्प आणि बी-पिलरवर 25 व्या ॲनिव्हर्सरीचे बॅजिंग समाविष्ट आहे. लिमिटेड एडिशन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना 7 प्रकारचे एक्सटिरिअर कलर ऑप्शन्स मिळतील.
Kylaq स्पेशल एडिशनमध्ये 10-इंचाची टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो AC, पावर-फोल्डिंग विंग मिरर, डॅश इन्सर्ट, क्रोम गार्निश असलेले लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, पुढील USB Type-C पोर्ट, रिअर सेंटर आर्मरेस्ट, इन-कार कनेक्टिव्हिटी सूट, 60:40 स्प्लिट-फोल्डिंग रिअर सीट, की-लेस एंट्री व स्टार्ट, ऑटो-डिमिंग IRVM, सनरूफ, 6-वे पावर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, लेदरॅट अपहोल्स्ट्री, वायरलेस फोन चार्जर यांसारखी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी
हा स्पेशल एडिशनही रेग्युलर मॉडेलप्रमाणेच 115 bhp क्षमतेचा 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. कंपनीच्या मते, मॅन्युअल व्हेरिएंट 0-100 किमी/ताशी वेग फक्त 10.5 सेकंदांत तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 11.69 सेकंदांत गाठू शकतो. मायलेज बाबतीत, मॅन्युअल व्हेरिएंटचा दावा 19.68 किमी/लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटचा दावा 19.05 किमी/लिटर असा करण्यात आला आहे.