
फोटो सौजन्य: Pinterest
Tata Tiago CNG Automatic मध्ये 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन CNG मोडमध्ये सुमारे 73 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. कारमध्ये 5-स्पीड AMT गिअरबॉक्स मिळतो, ज्यामुळे शहरातील वाहतुकीत ड्रायव्हिंग अधिक सोपे आणि आरामदायक होते. स्मूद गिअर शिफ्टिंग आणि विश्वासार्ह परफॉर्मन्ससाठी ही कार ओळखली जाते. ड्युअल-फ्यूल सिस्टीम (CNG आणि पेट्रोल) असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासात CNG संपल्यास पेट्रोलवर सहज स्विच करता येते.
‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार
Tata Tiago CNG Automatic चे ARAI सर्टिफाइड मायलेज 28.06 km/kg इतके आहे, ज्यामुळे ती किफायतशीर CNG कार्समध्ये अव्वल ठरते. मॅन्युअल CNG व्हेरिएंटमध्ये मायलेज 26.49 km/kg आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असूनही कार उत्तम परफॉर्मन्स देते. शहरातील ट्रॅफिकमध्ये AMT चा मोठा फायदा होतो आणि CNG वापरामुळे इंधन खर्चात सुमारे 50% पर्यंत बचत होऊ शकते.
Tata Tiago मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले असून, ते वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट करते. याशिवाय 8-स्पीकर हरमन ऑडिओ सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा, LED DRLs आणि 15-इंच अलॉय व्हील्स यांसारखी फीचर्स कारला प्रीमियम लुक देतात. कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, व्हॉइस कमांड्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीमुळे स्मार्टफोनद्वारे कार मॉनिटर करण्याची सुविधाही मिळते.
Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल
Tata Tiago ला Global NCAP कडून 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS with EBD, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय-स्पीड अलर्ट सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम) आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलमुळे सिटी ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, उत्कृष्ट मायलेज आणि टाटाची विश्वासार्ह सेफ्टी असलेली कार हवी असेल, तर Tata Tiago CNG Automatic एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कमी खर्च, आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव आणि लो मेंटेनन्ससह ही कार व्हॅल्यू फॉर मनी कार आहे.