फोटो सौजन्य: iStock
ह्युंदाईच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. 2025 मध्ये कंपनीने व्हेन्यूचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील लाँच केले होते. आता 2026 साठी ह्युंदाईने आधीच एक मोठी योजना आखली आहे. कंपनी पुढील वर्षी भारतात एकूण चार नवीन कार लाँच करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये बजेट ते प्रीमियम सेगमेंटचा समावेश आहे. या कारमध्ये फेसलिफ्ट, नवीन इलेक्ट्रिक कार आणि एक पूर्णपणे नवीन एसयूव्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, ह्युंदाईची पहिली लाँचिंग 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत होऊ शकते. चला या आगामी कारच्या लिस्टवर एक नजर टाकूया.
Hyundai 2026 ची सुरुवात 6व्या जनरेशनच्या Verna Facelift मॉडेलपासून करण्याची शक्यता आहे. सध्याची Verna मार्च 2023 मध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीच्या तीन वर्षांच्या प्रॉडक्ट लाइफसायकलनुसार एप्रिल 2026 मध्ये तिचे अपडेटेड व्हर्जन सादर होऊ शकते.
नवीन Verna चा फ्रंट डिझाइन लेटेस्ट Hyundai Sonata पासून प्रेरित असणार असून, त्यामुळे कार अधिक शार्प आणि स्पोर्टी दिसेल. यात 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल, ज्यामध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट असेल. इंजिन पर्याय सध्यासारखेच ठेवले जाण्याची शक्यता आहे.
2026 च्या दुसऱ्या तिमाहीत Hyundai Exter Facelift लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन Exter मध्ये 12.9-इंच टचस्क्रीन सिस्टम आणि 9.9-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच नवीन फ्रंट बंपर, अपडेटेड हेडलॅम्प्स, टेललॅम्प्स आणि 15-इंचचे नवीन अलॉय व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल
जून किंवा जुलै 2026 मध्ये Hyundai आपली इलेक्ट्रिक कार Ioniq 5 Facelift भारतात लाँच करू शकते. या इलेक्ट्रिक वाहनात नवीन डिझाइन एलिमेंट्ससह रिअर वायपर, डिजिटल की 2, नवीन स्टीयरिंग व्हील आणि 12.3-इंचचे दोन मोठे डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या EV मध्ये 84kWh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात येऊ शकते, ज्यामुळे ड्रायव्हिंग रेंज लक्षणीयरीत्या वाढेल.
फेस्टिव्ह सीझनच्या आसपास Hyundai भारतात Bayon नावाची पूर्णपणे नवी SUV लाँच करू शकते. ही SUV 4 मीटरपेक्षा मोठी असेल आणि Venue पेक्षा वरच्या सेगमेंटमध्ये पोझिशन केली जाईल. ही कार चौथ्या जनरेशन i20 प्लॅटफॉर्म वर आधारित असण्याची शक्यता असून, यात 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.






