
Cheapest Adas Cars In India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आधी लोक गाडी घेताना फक्त मायलेज किती देते, दिसायला कशी आहे आणि किंमत किती आहे एवढंच बघायचे. पण आता काळ बदललाय. लोकांना सेफ्टी पाहिजे. अपघात खूप वाढलेत आणि म्हणूनच कंपन्या आता त्यांच्या गाड्यांमध्ये ADAS सारखं भारी सेफ्टी फिचर देत आहेत.
ADAS म्हणजे काय तर, ही गाडीमध्ये लावलेली एक स्मार्ट सिस्टिम आहे. समोर कॅमेरा आणि रडार असतो, तो रस्त्यावर लक्ष ठेवतो. समोर अचानक कोणी आलं तर गाडी स्वतःहून ब्रेक मारते. ड्रायव्हरला झोप लागली किंवा लेन सोडली तर लगेच अलर्ट करते. थोडक्यात, हा तुमचा बॉडीगार्डच आहे. तुम्हाला कमी बजेटमध्ये अशी सेफ्टीवाली गाडी हवी असेल तर या 4 गाड्या नक्की बघा. Cheapest Adas Cars In India:
9.39 लाखापासून सुरूहोंडा अमेझ सध्या सगळ्यात स्वस्त ADAS वाली गाडी आहे. तिच्या टॉप मॉडेल ZX मध्ये लेव्हल 2 ADAS मिळतं. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 90 hp पॉवर देतं. मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक दोन्हीमध्ये येते.यात काय मिळतं? अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेनमध्ये ठेवणारी सिस्टिम, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, 6 एअरबॅग आणि ऑटो हाय बीम. फॅमिलीसाठी एकदम बेस्ट सेडान आहे.
9.55 लाखापासून सुरूमारुतीने पण आता ADAS आणलंय. बलेनोच्या अल्फा (O) मॉडेलमध्ये लेव्हल 2 ADAS आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 82 bhp पॉवर. मॅन्युअल आणि AMT ऑटोमॅटिकमध्ये मिळते. कंपनी सांगते की तिचा ऑटोमॅटिक वाला 24.77 चा मायलेज देतो.यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग आणि 9 इंचाची मोठी स्क्रीन मिळते. हॅचबॅक घ्यायची असेल तर ही सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे.
12.02 लाखापासून सुरू महिंद्राची ही छोटी SUV पण ADAS मध्ये भारी आहे. AX5 L मॉडेलमध्ये लेव्हल 2 ADAS मिळतं. 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 131 hp पॉवर देतं. म्हणजे पॉवरच्या बाबतीत ही सगळ्यात पुढे आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही आहे.यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, लेन कीप असिस्ट, 6 एअरबॅग, 10.25 इंचाची स्क्रीन आणि सगळ्यात भारी म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफ. लूक आणि सेफ्टी दोन्ही पाहिजे असेल तर ही घ्या.
11.99 लाखापासून सुरूहोंडा सिटी तर सगळ्यांची लाडकी आहे. तिच्या V, ZX आणि ZX+ मॉडेलमध्ये लेव्हल 2 ADAS मिळतं. 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 121 hp पॉवर देतं. मॅन्युअल आणि CVT मध्ये येते.यात कोलिजन कमी करणारी ब्रेकिंग सिस्टिम, अडॅप्टिव्ह क्रूझ, लेन असिस्ट, 6 एअरबॅग आणि 8 इंचाची स्क्रीन. थोडं बजेट वाढवू शकत असाल तर सिटीपेक्षा चांगला ऑप्शन नाही.
भारतात पुढील 12 महिन्यांत येणार 7 नवीन कॉम्पॅक्ट SUV; मारुती, रेनॉल्टसह फोक्सवॅगनची तयारी!
ADAS म्हणजे Advanced Driver Assistance System. हे काही जादू नाही, तर कॅमेरा आणि रडारचा खेळ आहे. हे सेन्सर सतत पुढचा रस्ता, लेन, समोरची गाडी बघत असतात.
ऑटोमॅटिक ब्रेकिंग – समोर कोणी आलं तर गाडी स्वतः ब्रेक मारते.
लेन असिस्ट – तुम्ही लेन सोडली तर गाडी तुम्हाला परत लेनमध्ये आणते किंवा स्टेअरिंग हलवते.
अडॅप्टिव्ह क्रूझ – हायवेवर पुढच्या गाडीपासून अंतर ठेवून स्पीड कंट्रोल करते.
हाय बीम असिस्ट- समोरून गाडी आली तर आपोआप लाईट कमी जास्त करते.म्हणूनच मित्रांनो, गाडी घेताना फक्त मायलेज नका बघू, ADAS आहे का ते पण बघा. कारण मायलेज पैसे वाचवेल, पण ADAS जीव वाचवेल.
Ans: ADAS म्हणजे Advanced Driver Assistance System. ही कॅमेरा आणि रडारच्या मदतीने ड्रायव्हरला सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी मदत करणारी स्मार्ट सिस्टिम आहे.
Ans: Honda Amaze ही सर्वात स्वस्त ADAS कार असून तिची किंमत 9.39 लाख रुपयांपासून सुरू होते.
Ans: Maruti Baleno च्या Alpha (O) मॉडेलमध्ये Level-2 ADAS मिळते.