(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
या नवीन अपडेटमधील सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे बाईकचे रायडिंग पोश्चर आणि हँडलिंग. Apex व्हेरियंटमध्ये कंपनीने हँडलबारची जागा बदलली असून तो ५६ mm खाली आणि ५७ mm पुढे सरकवला आहे. यामुळे रायडरला आता बाईक चालवताना पूर्वीपेक्षा जास्त पुढच्या बाजूला झुकावे लागेल, ज्यामुळे एक स्पोर्टी अनुभव मिळतो. यासोबतच उत्तम रस्ते पकडीसाठी बाईकमध्ये नवीन टायर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे हायवे आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर अधिक आत्मविश्वास देतात. ही मोटरसायकल थेट ‘Triumph Speed 400’ शी स्पर्धा करते. चला, या बाईकची नवीन वैशिष्ट्ये आणि सध्याची किंमत जाणून घेऊया.
इंजिन आणि कामगिरीचा विचार केला तर कंपनीने यात कोणताही तांत्रिक किंवा मेकॅनिकल बदल केलेला नाही. यात जुनेच 452cc चे लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 40 PS ची power आणि 40 Nm चा टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लचमुळे गिअर बदलणे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत होते. सस्पेंशनसाठी समोर 43 mm चे टेलिस्कोपिक आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले असून, सुरक्षेसाठी ड्युअल चॅनेल एबीएससह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स मिळतात.
ही मोटरसायकल पुढील आणि मागील अशा दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्सने सुसज्ज आहे, तसेच यात ‘डुअल-चॅनेल ABS’ ची सुविधाही उपलब्ध आहे. यात 4-इंचाचा TFT डिस्प्ले देखील आहे, ज्याच्या मदतीने ‘Google Maps’ द्वारे नेव्हिगेशन करणे शक्य होते.
याव्यतिरिक्त, ही बाईक स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, USB Type-C चार्जिंग पोर्ट आणि दोन वेगवेगळ्या ‘रायडिंग मोड्स’ची सुविधा देते. या मोटरसायकलचे ‘कर्ब वेट’ (इंधन आणि द्रव्यांसह एकूण वजन) 185 किलोग्राम इतके आहे. यामध्ये 11-लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे, जी आकाराने थोडी लहान वाटते. जर कंपनीने या बाईकमध्ये अधिक मोठ्या क्षमतेची इंधन टाकी दिली असती, तर ते अधिक सोयीचे ठरले असते. Royal Enfield Guerrilla 450 ची किंमत ₹2,49,194 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर याच्या सर्वोच्च व्हेरिएंटची किंमत ₹2,72,479 (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही ही बाईक विविध रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता; यातील Apex व्हेरिएंट लाल, काळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.






