केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
ओला ईलेक्ट्रिकने त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनी त्यांच्या दोन मॉडेल Ola S1 X (2kWh जेन 3) स्कूटर आणि Roadster X (2.5kWh) बाईकची सुरुवातीची किंमत कमी करून फक्त 49,999 रुपये (एक्स-शोरूम) केली आहे. याव्यतिरिक्त, ओला त्यांच्या संपूर्ण स्कूटर आणि बाईक लाईनअपवर 50 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ग्राहक 31 मार्च 2026 पर्यंत या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहेत. अशा परिस्थितीत जर काळजीपूर्वक पाहिले तर, सर्वसामान्य पेट्रोल बाईक्स आणि स्कूटर्सच्या तुलनेत ओलाच्या बाईक्स आणि स्कूटर्स निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे ओलाच्या बाईक्स आणि स्कूटर्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ओला इलेक्ट्रिकचे सीएमडी भाविश अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे की, पेट्रोलच्या वाढत्या किंमती आपल्याला संकेत देत आहेत की, आपल्याला ऊर्जा आत्मनिर्भरतेची गरज आहे. कंपनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कंपनीचे असे ध्येय आहे की, लोकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा देणे आणि लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास प्रोत्साहित करणे.
Car Care Tips: वेळेआधीच धोका देऊ शकतात कारमधील ‘हे’ 4 सेन्सर्स! वेळीच राहा स्मार्ट
कंपनी आता सर्विस ट्रस्ट गॅरंटी देत आहे. जर तुमच्या गाडीची सर्व्हिस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा झाली, तर प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी कंपनी तुम्हाला मोफत ओला कॅब व्हाउचर्स देणार आहे. ओला आता 60% पर्यंतची खात्रीशीर बायबॅक व्हॅल्यू देत आहे. भविष्यात जेव्हा तुम्ही नवीन ओला उत्पादन खरेदी कराल, तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. अशा पद्धतीने कंपनी ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.






