फोटो सौजन्य: Freepik
सध्या पावसाचे दिवस जरी संपायला आले असले तरी त्यामुळे बाईक्सवर उद्भवणाऱ्या समस्या कमी व्हायचे काही नाव घेत नाही आहे. मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांमध्ये पार्किंगसाठी जागा नसल्या कारणाने अनेक जण आपली बाईक मोकळ्या जागेतच पार्क करतात. जेव्हा मग पाऊस तेव्हा या बाईक्सना चांगलाच फटका बसतो. या पावसाच्या पाण्यामुळे बाइकमधील काही पार्ट्सना गंज सुद्धा लागतो. जर बाईक चांगलीच गंजली असेल तर यामुळे आपल्याला ती बाहेर सुद्धा काढावीशी वाटत नाही.
जर तुमच्या सुद्धा बाईकला गंज लागला असेल आणि हा गंज कमी करण्यासाठी जर तुम्ही उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेऊया, काही सोप्या उपायांबद्दल ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाईकवरील गंज कमी करू शकता.
हे देखील वाचा: सणासुदीच्या काळात Tata Punch Facelift चे लॉंचिग, किंमत अगदीच किफायतशीर
बाईक कितीही महाग असली तरी ती पावसाळ्यात भिजल्यानंतर गंजण्याची शक्यता वाढते. अशा बाईकला गंजण्यापासून वाचवण्यासाठी, ती पाण्याने नीट धुवा आणि नंतर स्वच्छ कापडाने तिला पुसून घ्या.
बाईकवरील गंज साफ करण्यासाठी क्रोम पॉलिशचा वापर केला जाऊ शकतो. जर बाईकमध्ये थोडी हवा असेल तर अशा परिस्थितीत या पॉलिशचा वापर करता येतो. बाइकच्या गंजलेल्या पार्ट्सवर हे क्रोम पॉलिश लावावे लागते. यानंतर ते कापडाने साफ केल्यावर गंज कमी होऊ लागतो.
बाईकवरील गंज काढण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जाऊ शकतो. हा एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय आहे. ॲल्युमिनियम रासायनिक रीतीने गंजावर रिऍक्ट करते, यामुळे गंज काढून टाकण्यास मदत होते. तसेच, बाईकवर इतर कोणत्याही खुणा राहत नाहीत.
दुचाकीवरील गंज काढण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरता येतो. यासाठी तुम्हाला पहिले बाईकच्या गंजलेल्या भागावर व्हिनेगर फवारावे लागेल. यानंतर, त्यावर सोडा शिंपडावा लागेल आणि तो काही काळ सुकल्यानंतर, त्याला स्क्रब ब्रश किंवा सँडपेपरने घासून घ्यावे लागेल. ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर तुच्या बाईकचा गंज साफ होईल.
खाण्यायोग्य मीठ आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही बाईकवरील गंज साफ करू शकता. यासाठी गंजलेल्या पार्ट्सवर मीठ शिंपडावे लागेल. नंतर अर्ध्या लिंबामध्ये मीठ घालून गंजलेल्या भागांवर ते लावून घ्या. काही काळ ते तसेच राहू द्या. यानंतर, पुन्हा घासून स्वच्छ करा. यामुळे बाईकवरील गंज साफ होईल.
तुम्ही पांढऱ्या टूथपेस्टच्या मदतीने बाईकवरील गंज देखील साफ करू शकता. यासाठी तुम्हाला गंजलेल्या भागावर पांढरी टूथपेस्ट लावावी लागेल. यानंतर, ते ओल्या कापडाने पुसून टाका. अशा प्रकारे तुम्ही बाईकवरील गंज साफ करू शकाल.