फोटो सौजन्य - iStock
भारतीय ऑटो मार्केटमध्ये सणासुदींच्या काळात नवनव्या कार लॉंच होत आहेत. यामुळे ग्राहकांकडे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. या लॉंचिगमध्ये भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटाने ही नवीन टाटा पंच फेसलिफ्टचे लॉंचिग केले आहे. विशेष म्हणजे ही कार आश्चर्यकारकपणे परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केली गेली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शो रुम किंमत ही 6.13 लाख रुपये आहे. कंपनीच्या टाटा पंच या भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. टाटा पंचला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अपग्रेडेड व्हर्जनमुळे ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
Tata Punch Facelift वैशिष्टये
टाटा पंचमध्ये 10.25-इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. या कारमधील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे या कारमध्ये सनरुफ आहे. नवीन डिझाइन केलेले सेंटर कन्सोल, मागील एसी व्हेंट्स वायरलेस Android Auto आणि Apple Carplay ,वायरलेस चार्जिंग पॅड आणि सी-टाइप, फास्ट चार्जिंग पोर्ट इत्यांदी वैशिष्टांचा समावेश असणार आहे. यातील काही वैशिष्ट्ये ही केवळ पूर्ण आणि क्रिएटिव्ह प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.
Tata Punch Facelift डिझाईन नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्ही प्रमाणे काही फरक राखला गेला असला तरी नव्या पंच मध्ये आणि पंच ईव्हीमध्ये काही साम्य घटक आहेत. कारमध्ये एलईडी डीआरएल साईन, नवीन हेडलॅम्प तसेच नवीन स्टायलिश बंपर असून विशेष म्हणजे डॅशबोर्डसाठी सुधारित रंग योजना केली आहे.
Tata Punch Facelift इंजिन
कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्ससह असणार आहे. हे इंजिन 86hp आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. आउटगोइंग पंच प्रमाणेच या कारमध्येही CNG मॉडेल देखील उपलब्ध होणार आहे. या CNG सोबत AMT गिअरबॉक्स देखील ऑफरवर असू शकतो.
टाटा पंच फेसलिफ्ट ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये Hyundai Exter आणि Citroen C3 शी थेट स्पर्धा करणार आहे तसेच nissan magnite आणिRenault Kiger बेस मॉडेलशी या कारची स्पर्धा असणार आहे.