फोटो सौजन्य: @the_scrapperr/ X.com
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात Mahindra Scorpio N Facelift ची सातत्याने टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेले मॉडेल जाड कॅमोफ्लाजमध्ये होते, यावरून कंपनी डिझाइन आणि फीचर्समध्ये काही बदल करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, Scorpio N चा ओव्हरऑल बॉक्सी आणि मजबूत लूक कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.
Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?
Scorpio N Facelift मध्ये मोठे डिझाइन बदल अपेक्षित नाहीत. मात्र फ्रंट आणि रिअर प्रोफाइलमध्ये हलके कॉस्मेटिक अपडेट्स दिले जाऊ शकतात. नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड LED लाइटिंग आणि नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे SUV अधिक फ्रेश आणि आधुनिक दिसेल.
काही रिपोर्ट्सनुसार, Mahindra Scorpio N Facelift मध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप देण्यात येणार नाही, ज्याची अपेक्षा अनेक ग्राहक करत होते. त्याऐवजी कंपनी फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देऊ शकते. मात्र याबाबत अद्याप महिंद्राने अधिकृत माहिती दिलेली नाही.
Scorpio N Facelift मध्ये अनेक प्रीमियम आणि सेफ्टी फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, Level-2 ADAS, हाय बीम असिस्ट, स्पीड लिमिट असिस्ट आणि इतर अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश असू शकतो. या अपडेट्समुळे SUV आणखी टेक-लोडेड बनेल.
TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ
इंजिन ऑप्शन्समध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. Scorpio N Facelift मध्ये सध्याचे 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनच देण्यात येतील. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध असतील. SUV ची ऑफ-रोडिंग क्षमता देखील कायम राहणार आहे.
महिंद्राने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नसली, तरी Scorpio N Facelift भारतात 2026 च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत 20,000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
ट्रिपल स्क्रीन फीचर नसले तरी, नवे फीचर्स, दमदार इंजिन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Mahindra Scorpio N Facelift SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवेल.






