Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Honda Car Sales in August 2026: होंडा कार्स इंडियाने ऑगस्ट 2026 मध्ये एकूण 5,385 गाड्यांची विक्री केली. ऑगस्ट 2025 मधील 3,850 गाड्यांच्या तुलनेत विक्रीत 40 टक्के वाढ झाली. मात्र जुलै 2026 मधील 6,014 गाड्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विक्री सुमारे 10 टक्क्यांनी कमी झाली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 13, 2026 | 01:15 PM
Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • होंडाची ऑगस्टमधील विक्री वार्षिक तुलनेत 40% वाढून 5,385 गाड्यांवर.
  • Honda Amazeच्या 3,512 गाड्यांची विक्री; मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट.
  • जुलैच्या तुलनेत होंडाची एकूण विक्री सुमारे 10% घटली.
 

Honda India Sales Report: होंडा कंपनीसाठी गेल्या महिन्याचा म्हणजे ऑगस्टचा काळ खूप चांगला गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. या वाढीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे होंडा Amaze आहे. ही गाडी सर्वात स्वस्त गाडी असल्याने लोक तिला खूप पसंत आहे.

आकडे काय सांगतात?

होंडा कार्स इंडियाने ऑगस्टमध्ये एकूण 5,385 गाड्या विकल्या. गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये हा आकडा फक्त 3,850 होता त्याने थेट 40 टक्के वाढ. हे होंडासाठी खूप मोठं यश आहे. पण जर जुलै महिन्याशी तुलना केली तर थोडा फरक आहे. जुलै 2026 मध्ये कंपनीने 6,014 गाड्या विकल्या होत्या. त्यामानाने ऑगस्टमध्ये 10 टक्के घट असून सध्या होंडाकडे Amaze, Elevate, City आणि ZR-V अशा चार गाड्या आहेत. Honda Car Sales in August 2026:

कोणती गाडी किती विकली गेली?

सगळ्यात जास्त विकलेली ही Amaze गाडी आहे. होंडाची ही लाडकी गाडी ऑगस्टमध्ये 3,512 लोकांनी विकत घेतली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 100 टक्के वाढ झाली असून म्हणजे दुप्पट विक्री. जुलैमध्ये Amaze च्या 3,436 गाड्या विकल्या होत्या, त्यामानाने ऑगस्टमध्ये 2 टक्के वाढ झाली.

दुसरीकडे होंडा Elevate ची विक्री थोडी कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये Elevate चे फक्त 1,326 युनिट विकले गेले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 20 टक्के म्हणजेच 1,660 गाड्या विकल्या होत्या. जुलैमध्ये तर 1,949 गाड्या विकल्या होत्या, त्यामानाने गेल्या महिन्यात 32 टक्के घट झाली.

फोक्सवॅगन डुकाटीला पोर्टफोलिओमधून बाहेरचा रस्ता दाखवणार? कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

होंडा City बद्दल बोलायचं तर ऑगस्टमध्ये फक्त 514 गाड्या विकल्या गेल्या. आणि होंडाची सगळ्यात महागडी गाडी ZR-V, तिचे फक्त 33 युनिट विकले गेले. City चं नवीन मॉडेल नुकतंच आलंय आणि ZR-V ही तर बाहेरून आणलेली CBU गाडी आहे, त्यामुळे ती महाग आहे.

Amaze एवढी का विकली जाते? किंमत आणि फीचर्स

Amaze ही 4 मीटरपेक्षा लहान सेडान आहे. तिची थेट टक्कर मारुती Dzire शी आहे. तिची किंमत 7.65 लाख रुपयांपासून सुरु होते, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना ती परवडते.या गाडीला सेफ्टीसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं आहे, जी खूप मोठी गोष्ट आहे. यात 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे जे 89 BHP पॉवर देतं. मायलेज पण चांगलं आहे, कंपनी म्हणते की ती 19.46 किलोमीटर प्रति लिटर धावते.

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा

यात 416 लिटरची मोठी डिकी आहे आणि 172 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यामुळे खड्ड्यात पण गाडी सहज चालते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय आहेत आणि कंपनी CNG चा पर्याय पण देते. एकंदरीत बघायचं तर होंडाला Amaze ने तारलं आहे. स्वस्त किंमत, चांगलं मायलेज आणि 5 स्टार सेफ्टी, यामुळेच लोक Amaze ला पसंती देत आहेत.

 

Web Title: A rival to the maruti dzire has suddenly become a hit sales surged by 100 in a single month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Car News
  • Honda Car
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
1

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग
2

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
3

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Electrical Safety: स्विच ऑन करताच ठिणगी पडतेय? दुर्लक्ष करू नका; कधी Loose Connection अन् कधी धोक्याचा इशारा? जाणून घ्या…
4

Electrical Safety: स्विच ऑन करताच ठिणगी पडतेय? दुर्लक्ष करू नका; कधी Loose Connection अन् कधी धोक्याचा इशारा? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.