Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

भारतात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Ashok Leyland, ज्यांनी नुकतेच कमर्शियल लाइट वाहन सेगमेंटमध्ये दोन नवीन वाहने लाँच केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य: @ALIndiaOfficial/X.com

फोटो सौजन्य: @ALIndiaOfficial/X.com

Follow Us
Follow Us:
  • अशोक लेलँडकडून दोन खास वाहने लाँच
  • DOST आणि DOST+ असे या वाहनांची नावे
  • सुरवातीची किंमत 8.20 लाख रुपयांपासून सुरु
भारतात ऑटो बाजारात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये दमदार वाहने ऑफर करत असतात. कमर्शियल सेगमेंटमध्ये सुद्धा अनेक कंपन्या उत्तम वाहने लाँच करत आहे. नुकतेच, Ashok Leyland ने सुद्धा या सेगमेंटमध्ये त्यांची 2 नवीन वाहने लाँच केली आहे.

वाहन निर्माता अशोक लेलँड भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये कमर्शियल वाहने विकते. नुकतेच कंपनीने लाईट कमर्शियल व्हेईकल (LCV) सेगमेंटमध्ये DOST आणि DOST+ XL चे ट्विन-फ्यूएल व्हेरिएंट्स सादर केले आहेत. या वाहनांमध्ये कोणती फीचर्स आहेत? ती कोणत्या किमतीत सादर करण्यात आली आहेत? या अहवालात आपण सर्व डिटेल्स जाणून घेऊयात.

‘या’ कंपनीच्या कार महागण्याची शक्यता! किती रुपयांनी वाढवली जाऊ शकते किंमत? जाणून घ्या

नवीन वाहने सादर

अशोक लेलँडने भारतीय बाजारपेठेतील आपल्या लाईट कमर्शियल व्हेईकल विभागात दोस्त आणि दोस्त+ एक्सएल ही नवीन वाहने अधिकृतपणे सादर केली आहेत. ही मॉडेल्स ट्विन-फ्यूएल प्रकारात उपलब्ध करून दिली जात आहेत.

प्रमुख फीचर्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘Dost’ मॉडेलची पेलोड क्षमता 1218 किलो असून, ते 400 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. हे साध्य करण्यासाठी, यामध्ये 120 लिटर क्षमतेची CNG टाकी बसवण्यात आली आहे; तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी 5 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकीही देण्यात आली आहे.

Maruti, TATA की Hyundai, कोणती कंपनी ऑफर करते ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असणारी बेस्ट कार?

ट्विन फ्यूल DOST+ XL मध्ये 1410 किलो इतकी पेलोड क्षमता देण्यात आली आहे. यामध्ये 148 लिटर क्षमतेचा CNG टँक आणि 5 लिटरचा पेट्रोल टँक मिळतो, ज्यामुळे या वाहनाची रेंज सुमारे 500 किलोमीटरपर्यंत जाते.

अधिकाऱ्यांचे मत

Ashok Leyland च्या LCV बिझनेस हेड Viplav Shah यांनी सांगितले की, DOST रेंजने आधीच लाखो छोट्या व्यावसायिकांचा विश्वास जिंकला आहे. ट्विन फ्यूल व्हेरियंटमुळे छोट्या व्यापाऱ्यांना आणि फ्लीट ऑपरेटर्सना अधिक पर्याय आणि उत्तम कार्यक्षमता मिळणार आहे. हे वाहन CNG वर कमी खर्चात चालते आणि पेट्रोलमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणे शक्य होते, त्यामुळे इंधन उपलब्धतेची चिंता राहत नाही. तसेच कमी उत्सर्जनामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होऊन देशाच्या सस्टेनेबिलिटी उद्दिष्टांना मदत होते.

किंमत किती?

कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या ट्विन फ्यूल DOST ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.20 लाख रुपये आहे. तर ट्विन फ्यूल DOST+ XL ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Ashok leyland new commercial vehicle dost and dost plus launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

शहरांमधील SUV गाड्या बनत आहेत का वाहतूक कोंडीचे प्राथमिक कारण? जाणून घ्या
1

शहरांमधील SUV गाड्या बनत आहेत का वाहतूक कोंडीचे प्राथमिक कारण? जाणून घ्या

ऐकाव ते नवलंच! या कारच्या आत आहे दोन मजली अपार्टमेंट! ही आहे जगातील सर्वात मोठी आणि आलिशान कार
2

ऐकाव ते नवलंच! या कारच्या आत आहे दोन मजली अपार्टमेंट! ही आहे जगातील सर्वात मोठी आणि आलिशान कार

कमी खर्च, मोठी सोय; रिक्षा, भारतीय वाहतुकीचा अविभाज्य भाग
3

कमी खर्च, मोठी सोय; रिक्षा, भारतीय वाहतुकीचा अविभाज्य भाग

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स
4

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.