Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?

नवीन एथर कोनार्क आणि बजाज चेतक C3501 मधील चुरशीच्या स्पर्धेत ग्राहकांसमोर नेमका कोणता उत्तम पर्याय आहे? बजेट, रेंज आणि आधुनिक फीचर्स नक्कीच तुमचा निर्णय बदलू शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 31, 2026 | 08:00 AM
Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?
Follow Us
Follow Us:
  • एथर कोनार्क आणि बजाज चेतक C3501 या दोन्ही लोकप्रिय फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमती आणि रेंजमध्ये मोठा फरक आहे.
  • एथर कोनार्क आधुनिक फीचर्स आणि मोठ्या बॅटरी पर्यायांसह येते, तर बजाज चेतक त्याच्या क्लासिक लूक आणि व्यावहारिकता यासाठी ओळखली जाते.
  • ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार किंमत आणि रेंज तपासून आपल्या कुटुंबासाठी योग्य अशा इलेक्ट्रिक स्कूटरची निवड करावी.

कुटुंबासाठी वापरण्यास अगदी योग्य अशी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर शोधत असाल, तर एथरने नुकतीच भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित ‘कोनार्क’ स्कूटर लाँच केली असून, याद्वारे ब्रँडने मास-मार्केट ईव्ही स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. फॅमिली-ओरिएंटेड सेगमेंटमध्ये एथरच्या या नवीन स्कूटरची थेट स्पर्धा बजाज चेतक C3501 सोबत होत आहे. दोन्ही स्कूटर्स आपापल्या जागी उत्तम पर्याय ठरतात, पण तुमच्यासाठी कोणती स्कूटर योग्य आहे हे ठरवण्यासाठी आपण यांच्या किंमती आणि फीचर्सची सविस्तर तुलना पाहूयात,

किंमत तुलना

एथर कोनार्कच्या विविध प्रकारांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत,

  • S 100: ९९,९९९ रुपये
  • S 125: १,२१,९९९ रुपये
  • S 161: १,४४,९९९ रुपये
दुसऱ्या बाजूला, बजाज चेतक ३५ सिरीजच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत,
  • C3503: १,२४,१५७ रुपये
  • C3502: १,३६,९३९ रुपये
  • C3501: १,५२,१४० रुपये
Ather Konarc: एथरची नवी फॅमिली स्कूटर ‘कोनार्क’ लाँच; ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते किंमत आणि मिळतोय २०० किमीपर्यंतचा रेंज ऑप्शन

एथर कोनार्कची फीचर्स

एथर कोनार्क ही स्कूटर ब्रँडच्या नवीन ‘EL’ प्लॅटफॉर्मवर तयार केलेली पहिली स्कूटर आहे. ही स्कूटर सध्या तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये २.१ kWh, २.७ kWh आणि ३.५ kWh बॅटरीचा समावेश आहे. यामुळे अनुक्रमे १०० किमी, १२५ किमी आणि १६१ किमीची प्रमाणित रेंज मिळते. याशिवाय, कंपनी २०२७ मध्ये २०० किमी रेंज असणारा आणखी एक नवीन प्रकार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या स्कूटरच्या सस्पेन्शनसाठी फ्रंटला शोवा टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरला साईड-माउंटेड शॉक अब्जॉर्बर दिले आहेत, ज्यामध्ये १०० मिमी व्हील ट्रॅवल मिळतो. यामध्ये १४ इंचाचे फ्रंट आणि १२ इंचाचे रियर व्हील दिले गेले आहेत, ज्यामुळे खराब रस्त्यांवर गाडी चालवणे अत्यंत सुलभ होते. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, उच्च श्रेणीतील प्रकारांमध्ये पुढे २२० मिमी डिस्क ब्रेक आणि मागे १३० मिमीचा ड्रम ब्रेक सीबीएस (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम) सह मिळतो, तर बेस एस १०० मॉडेलमध्ये दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक दिले आहेत.

फीचर्सचा विचार केला तर, एस १२५ आणि एस १६१ व्हेरियंट्समध्ये ७ इंचाचा एलसीडी कन्सोल मिळतो, तर बेस मॉडेलमध्ये ४ इंचाचा युनिट दिला आहे. याशिवाय यात म्युझिक कंट्रोल, ओटीए अपडेट्स, रिव्हर्स मोड, हिल होल्ड आणि ‘फाइंड माय स्कूटर’ सारखे कनेक्टेड फीचर्स मिळतात. ग्राहकांसाठी यात ३१ लिटरची अंडरसीट स्टोरेज क्षमता आणि ॲप्रनवर २ लिटरचा डबी स्पेस दिला आहे.

‘बजाज चेतक स्कुटर’! दुचाकी विश्वाची महत्त्वाची पायरी!  भारताच्या मध्यमवर्गाचे स्वप्न साकार करणारी यशोगाथा!

बजाज चेतक C3501 ची वैशिष्ट्ये

बजाज चेतक C3501 ला निओ-रेट्रो डिझाइन देण्यात आले असून, त्याचे गोलसर बॉडी पॅनेल याला अतिशय प्रीमियम आणि फॅमिली-फ्रेंडली लूक देतात. यात फुल-एलईडी लायटिंग आणि ३५ लिटरची मोठी अंडरसीट स्टोरेज जागा मिळते. तसेच, दैनंदिन वापरासाठी ॲप्रनवर ५ लिटरची बंदिस्त ग्लोव्हबॉक्स जागा देण्यात आली आहे, जी अतिशय प्रक्टिकल ठरते.

या स्कूटरमध्ये ३.५ kWh ची बॅटरी दिली असून, ती सिंगल चार्जमध्ये १५३ किमीची रेंज देण्याचा दावा करते. याची कमाल स्पीड ताशी ८० किमी आहे. यात सिंगल-साइड लिंक्ड फ्रंट सस्पेन्शन आणि सिंगल रियर शॉक अब्जॉर्बर मिळतो. ब्रेकिंगसाठी यामध्ये पुढे २०० मिमी डिस्क आणि मागे १३० मिमी ड्रम ब्रेक दिला आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट, म्युझिक कंट्रोल, नेव्हिगेशन आणि डॉक्युमेंट स्टोरेजसह टच-सेन्सिटिव्ह टीएफटी कन्सोल मिळतो. सुरक्षितता आणि सोयीसाठी यामध्ये इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड आणि पार्किंगसाठी रिव्हर्स मोड देखील दिला आहे.

थोडक्यात निष्कर्ष काय ?

एथर कोनार्क ही दोन्हीपैकी जास्त फीचर्स असलेली स्कूटर आहे. या स्कूटरचे सध्याचे टॉप-स्पेक एस १६१ व्हर्जिन चेतक C3501 पेक्षा ७,१४१ रुपयांनी स्वस्त आहे आणि तरीही ती जास्त प्रमाणित रेंज देते. त्यामुळे, जर तुम्हाला जास्त फीचर्स असलेली आणि लांबच्या दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त स्कूटर हवी असेल, तर एथर कोनार्क एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, जर तुम्हाला प्रीमियम लूकसाठी TFT कन्सोल हवा असेल आणि तुम्ही फीचर्सपेक्षा व्यवहाराला जास्त प्राधान्य देत असाल, तर तुम्ही बजाज चेतकची निवड बिनधास्त करू शकता.

Web Title: Ather konarc vs bajaj chetak price comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • automobile
  • scooter
  • two wheelers

संबंधित बातम्या

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!
1

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू
2

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
3

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
4

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.