फोटो सौजन्य: Gemini
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून, रिपोर्टनुसार मागील महिन्यात देशभरात एकूण 18042 इलेक्ट्रिक वाहने विक्री झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 11909 युनिट्स इतकी होती. आकडेवारीनुसार Year-on-Year आधारावर विक्रीत तब्बल 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…
टाटा मोटर्सकडून विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली जाते. मागील महिन्यात कंपनीने देशभरात 7852 युनिट्स इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 5292 युनिट्स इतकी होती.
एमजी मोटर्सकडून भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपासून ते इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारपर्यंत विविध मॉडेल्सची विक्री केली जाते. मागील महिन्यात कंपनीने 4606 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 4527 युनिट्स होती.
महिंद्राकडून बाजारात अनेक दमदार इलेक्ट्रिक SUV ऑफर केल्या जातात. मागील महिन्यात कंपनीने 3589 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. याआधी जानेवारी 2025 मध्ये ही संख्या फक्त 739 युनिट्स होती.
VinFast कंपनीने 2025 च्या मध्यात आपल्या इलेक्ट्रिक कार्स भारतात सादर केल्या. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये या ब्रँडची एकूण विक्री 432 युनिट्स इतकी झाली आहे.
हुंडईकडूनही भारतात विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध करून दिल्या जातात. मागील महिन्यात कंपनीने 326 युनिट्सची विक्री केली आहे, तर जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 331 युनिट्स इतकी होती.






