फोटो सौजन्य: iStock
GST कमी झाल्याने अनेक जण सध्या 22 सप्टेंबरची वाट पाहत आहे. कारण याच दिवशीच जीएसटीचे नवीन दर वाहनांवर लागू होणार आहेत. यामुळे फक्त कार नाही तर बाईक सुद्धा स्वस्त झाल्या आहेत. अशातच जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर आज आपण काही 350cc सेगमेंटमधील बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील तरुणांमध्ये आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्यांमध्ये 350 सीसी सेगमेंटमधील बाईक नेहमीच लोकप्रिय आहेत. आता, 22 सप्टेंबरपासून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांच्या किमती 10 टक्क्याने कमी होतील. या बदलामुळे Royal Enfield आणि Honda सारख्या कंपन्यांच्या लोकप्रिय 350 सीसी बाईक्स अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ची किंमत सध्या 1.50 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. जीएसटी कपातीनंतर, याची अंदाजे किंमत 1,38,280 मध्ये खरेदी करता येईल. यात 349 सीसी, एअर-कूल्ड जे-सिरीज इंजिन आहे जे 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याची हलकी आणि कॉम्पॅक्ट डिझाइन दैनंदिन शहरी प्रवासासाठी या बाईकला आदर्श बनवते. फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट, यूएसबी चार्जिंग आणि ट्रिपर नेव्हिगेशन यांचा समावेश आहे.
Maruti Victoris की Grand Vitara, कोणती कार तुमच्यासाठी असेल एकदम परफेक्ट?
क्लासिक 350 ही भारतीय तरुणांमध्ये एक आवडती आणि लोकप्रिय बाईक आहे. याची सुरुवातीची किंमत सध्या 2,00,157 रुपये आहे, परंतु नवीन जीएसटी दरासह, याची किंमत सुमारे 1,84,518 रुपये असेल. यात समान 349 सीसी इंजिन आहे, जे सहज परफॉर्मन्स देते. याचा मायलेज सुमारे 35-37 किमी प्रति लिटर आहे. ड्युअल-चॅनल एबीएस आणि एलईडी लाइटिंग सारख्या फीचर्समुळे ती सुरक्षित आणि आधुनिक बनते.
रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही नेहमीच रॉयल एनफील्डची एक आयकॉनिक बाईक राहिली आहे. सध्या त्याची किंमत 1,76,625 रुपये आहे, जीएसटी कपातीनंतर ती अंदाजे 1,62,825 रुपये होईल. यात 349 सीसी इंजिन आहे जे 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. याचा मायलेज सुमारे 35 किमी प्रति लिटर आहे.
1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का! बाईकचे बिल व्हायरल
क्रूझर स्टाइलिंग आवडणाऱ्यांसाठी Meteor 350 एक उत्तम पर्याय आहे. नवीन GST दर लागू झाल्यानंतर या बाईकची किंमत (चेन्नई) ₹2,15,883 पासून सुरू होईल. यात 349cc इंजिन देण्यात आले आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करते. मायलेज अंदाजे 36 kmpl आहे. तसेच या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, LED हेडलाइट आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड यांसारखे फीचर्स दिले आहेत.
या लिस्टमध्ये असलेली एकमेव नॉन-RE बाईक म्हणजे Honda CB350. तिची सध्याची किंमत ₹2,14,800 असून, GST कपातीनंतर ती सुमारे ₹1,98,018 राहील. यात 348cc इंजिन आहे, जे 20.8 bhp पॉवर आणि 30 Nm टॉर्क निर्माण करते. मायलेज 42 kmpl पर्यंत मिळते, जे या सेगमेंटमधील सर्वाधिक आहे. ड्युअल-चॅनल ABS, LED हेडलाइट आणि डिजिटल डिस्प्ले यामुळे ही बाईक टेक्नॉलॉजीने समृद्ध आहे.