फोटो सौजन्य: X.com
काही दिवसांपूर्वीच मार्केटमध्ये एक नवीन एसयूव्ही लाँच करण्यात आली होती. ही कार म्हणजे Maruti Suzuki Victoris. ही कार लाँच होताच ग्राहकांनी या कारला उदंड प्रतिसाद दिला आहे. Grand Vitara देखील याच सेगमेंटमध्ये कंपनीकडून ऑफर केली जाते. दोन्ही एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटमधील किमतीतील फरक अंदाजे एक लाख रुपये आहे. तरीही, कोणती एसयूव्ही तुमच्यासाठी बेस्ट असेल? हे आज आपण जाणून घेऊयात.
मारुतीकडून नुकतीच Victoris SUV बाजारात आणली गेली आहे. या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट LXI असून त्यात 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 74 kW पॉवर आणि 137.1 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे आणि हे मॉडेल सध्या फक्त 2WD व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
तर Maruti Grand Vitara मध्ये बेस व्हेरिएंट म्हणून सिग्मा व्हेरिएंट उपलब्ध आहे. यात देखील 1.5 लिटर इंजिन देण्यात आले आहे, ज्यातून 75.8 kW पॉवर आणि 139 Nm टॉर्क निर्माण होतो. यामध्ये देखील फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मात्र, यात स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानामुळे थोडी अधिक पॉवर मिळते.
Maruti Victoris च्या बेस व्हेरिएंटमध्ये सुरक्षेसाठी ESP, TCS, EDC, हिल-होल्ड असिस्ट, ABS, EBD, रिअर पार्किंग सेन्सर्स, सहा एअरबॅग, फ्रंट सीट प्री-टेंशनर सीट बेल्ट, सीट बेल्ट हाइट ॲडजस्टर, ISOFIX चाईल्ड अँकरज, इंजिन इमोबिलायझर आणि टायर रिपेअर किट अशी फीचर्स दिली आहेत.
Maruti Grand Vitara च्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर्स, टायर रिपेअर किट, ESP, ABS, EBD, हिल-होल्ड असिस्ट, फ्रंट सीट प्री-टेंशनर, सीट बेल्ट हाइट ॲडजस्टर, ISOFIX चाईल्ड अँकरज, इंजिन इमोबिलायझर, डे-नाईट ॲडजस्टेबल मॅन्युअल IRVM आणि स्पीड वॉर्निंग बजर अशी सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
मारुती Victoris च्या बेस व्हेरिएंटची किंमत 10.50 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. मारुती ग्रँड विटाराच्या बेस व्हेरिएंटची किंमत 11.42 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.