फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो सेक्टर हे नेहमीपासूनच अनेक ऑटो कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. म्हणूनच तर अनेक स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर करतात. यातही आता ग्राहक वाढत्या इंधनाच्या किमतीला कंटाळून इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच एकीकडे इलेक्ट्रिक कार्स जरी लाँच होत असल्या तरी याचा परिणाम सीएनजी वाहनांच्या विक्रीवर झाला नाही.
भारत हा ऑटो उद्योगासाठी एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे आपल्याला प्रत्येक व्हेरियंट आणि अनेक रंगांमध्ये वाहने मिळतील. अनेक कार कंपन्या ग्राहकांच्या मागणीनुसार कार बनवतात, जेणेकरून प्रत्येक कुटुंब आपली स्वप्ने पूर्ण करू शकेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दररोज ऑफिसला जाण्यासाठी स्वस्त सीएनजी कारच्या शोधात असाल, तर आज आपण अशा काही कारबद्दल जाणून घेणार आहोत.
राज्यातील ‘एवढ्या’ किंमतीच्या Electric Vehicles होणार टॅक्स फ्री ! मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता, अनेक कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारकडे अधिक लक्ष देत आहेत. ग्राहकही या कार्सना चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्यांना दररोज 30-40 किमी प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी सीएनजी कार हा सर्वोत्तम पर्याय आहे. चला काही बेस्ट सीएनजी कार्सबद्दल जाणून घेऊया.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती प्रत्येक सेगमेंटमध्ये वाहने तयार करण्यात तरबेज आहे. मारुतीची अल्टो के10 सीएनजी ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 96 हजार रुपये आहे. या कारमध्ये 4 लोक आरामात बसून प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. ही कार जास्त रहदारीतही सहज चालवता येते. या कारमध्ये फ्रंट पॉवर विंडो, एसी, पार्किंग सेन्सर, गियर शिफ्ट इंडिकेटर, सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट, हॅलोजन हेडलॅम्प, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, सेंट्रल लॉकिंग इत्यादी फीचर्स देण्यात आली आहेत.
या यादीत टाटाची टियागो आयसीएनजी दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीचा दावा आहे की या कारचा मायलेज 27 किमी/किलोग्राम आहे. ही 5 सीटर कार आहे. जी 1.2 लिटर इंजिनने सुसज्ज आहे, जे सीएनजी मोडवर 73 एचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करण्याची पॉवर देते. या कारच्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे.
या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकीच्या सेलेरियो सीएनजी कारचे नाव येते. या कारची सीएनजी व्हेरियंट जास्तीत जास्त 34.43 किमी/किलो मायलेज देण्याची क्षमता आहे. या कारची भारतात एक्स-शोरूम किंमत 6.69 लाख रुपये आहे. या कारमध्ये 5 लोक आरामात बसू शकतात. या कारमध्ये सुरक्षेचेही विशेष काळजी घेण्यात आली आहे. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह, कारमध्ये EBD आणि एअरबॅग्जची सुविधा देखील आहे.