Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

Yamaha XSR 155 मार्केटमध्ये आल्याने तिचा थेट सामना TVS Ronin सोबत होणार आहे. चला या दोन्ही बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 08, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Yamaha XSR 155 लाँच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • थेट TVS Ronin सोबत असेल स्पर्धा
  • दोघांपैकी कोणती बाईक बेस्ट? जाणून घ्या
भारतात विविध सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर होत असतात. यातही आकषर्क लूक असणाऱ्या बाईकला मार्केटमध्ये दमदार मागणी मिळताना दिसते. आजच्या ग्राहकांना उत्तम परफॉर्मन्ससोबत चांगली लूक असणारी बाईक हवी आहे. हीच मागणी लक्षात घेत TVS ने Ronin बाईक लाँच केली, जिला ग्राहकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला.

नुकतेच Yamaha XSR 155 भारतात लाँच झाली, जी आता थेट TVS Ronin सोबत स्पर्धा करणार आहे. Yamaha XSR 155 ही तिच्या रेट्रो मॉडर्न लूकमुळे जास्त ओळखली जात आहे. मात्र, TVS Ronin आणि Yamaha XSR 155 मध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.

Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स

इंजिन आणि परफॉर्मन्स

Yamaha XSR 155 मध्ये त्याच 155cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे जे यामाहा MT-15 मध्ये आहे. हे इंजिन 18.4 पीएस पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क निर्माण करते. यात यामाहाची VVA (व्हेरिएबल व्हॉल्व्ह अ‍ॅक्च्युएशन) टेक्नॉलॉजी आहे, जी सुरळीत पॉवर डिलिव्हरी आणि सुधारित हाय-रेव्हिंग परफॉर्मन्स प्रदान करते.

दुसरीकडे, टीव्हीएस रोनिनमध्ये 225.9 सीसी, ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 20.4 पीएस पॉवर आणि 19.93 एनएम टॉर्क निर्माण करते. याचा अर्थ रोनिन अधिक टॉर्क देते, ज्यामुळे शहरी रायडिंगसाठी ही बाईक अधिक आनंददायी बनते, तर XSR 155 हाय-स्पीड आणि स्पोर्टी रायडिंगसाठी अधिक योग्य आहे.

Kia Seltos चा बाजारात धमाका! १०.९९ लाखांत लाँच झाली ऑल-न्यू जनरेशन SUV; पाहा जबरदस्त फीचर्स

गिअरबॉक्स आणि रायडींग अनुभव

दोन्ही बाईकमधील मुख्य फरक म्हणजे गिअरबॉक्स. यामाहा XSR 155 मध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशन आहे, हे जलद गिअर शिफ्टिंग आणि सुरळीत रायडिंग करण्यास मदत करते. दुसरीकडे, TVS रोनिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे, जो शहरातील ट्रॅफिक रायडिंगसाठी अधिक चांगल्या प्रकारे ट्यून केलेला आहे. XSR 155 मधील गिअरबॉक्स स्पोर्टी फील देतो तर रोनिनचा सेटअप कमी रिव्ह्सवरही आरामदायी टॉर्क देतो.

सीट आणि ग्राऊंड क्लीयरन्स

यामाहा XSR 155 च्या सीट उंची 810 मिमी आहे, जी थोडी उंच मानली जाते. उंच रायडर्ससाठी हे अधिक योग्य आहे. TVS Ronin च्या सीटची उंची 795 मिमी आहे, ज्यामुळे ती लहान रायडर्ससाठी देखील आरामदायी बनते.

ग्राउंड क्लीयरन्सच्या बाबतीत, Ronin चा ग्राउंड क्लीयरन्स 181 मिमी आहे, ज्यामुळे ती खडबडीत भूभागावर देखील आरामदायी बनते. दुसरीकडे, XSR 155 चा ग्राउंड क्लीयरन्स सुमारे 170 मिमी आहे, जे शहर आणि महामार्गावरील रायडिंगसाठी योग्य आहे.

मायलेज

मायलेजच्या बाबतीत Yamaha XSR 155 सुमारे 45 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते, तर TVS Ronin चे सरासरी मायलेज 35 ते 40 किमी प्रति लिटर दरम्यान आहे.

किंमत

किमतीच्या दृष्टीने पाहता TVS Ronin अधिक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.24 लाख ते 1.59 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर Yamaha XSR 155 ची एक्स-शोरूम किंमत 1.47 लाख रुपये आहे. त्यामुळे Yamaha ही थोडी प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते.

कोणती बाईक अधिक चांगली?

जर तुम्हाला स्पोर्टी राइडिंग, हाय आरपीएमवरील परफॉर्मन्स आणि क्लासिक स्टाइल यांचे कॉम्बिनेशन हवे असेल, तर Yamaha XSR 155 हा योग्य पर्याय आहे. मात्र, जर तुम्ही कम्फर्ट, चांगला टॉर्क आणि रोजच्या वापरासाठी उपयुक्त बाईक शोधत असाल, तर TVS Ronin अधिक योग्य ठरेल. राइडिंग क्वालिटी आणि मेंटेनन्स या दोन्ही बाबतीत Ronin ही अधिक प्रॅक्टिकल बाईक आहे.

Web Title: Yamaha xsr 155 vs tvs ronin which bike is best in terms of mileage price features engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS
  • Yamaha

संबंधित बातम्या

सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु
1

सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु

लेह-लडाखच्या खडबडीत रस्त्यांवर टेस्टिंग! त्यात 10 लाख किमीचे अंतरही पार, 26 जानेवारीला ‘ही’ कार इतर वाहनांना धडकी भरवणार
2

लेह-लडाखच्या खडबडीत रस्त्यांवर टेस्टिंग! त्यात 10 लाख किमीचे अंतरही पार, 26 जानेवारीला ‘ही’ कार इतर वाहनांना धडकी भरवणार

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक
3

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर
4

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.