Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग 'या' स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा
भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण कुठला असेल तर तो म्हणजे दिवाळी. या सणात आपल्याला सगळीकडेच आकर्षक रोषणाई पाहायला मिळते. या सणात आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना भेटतो. या दिवाळीच्या सणात अनेक जण नवीन सुरूवात करत असतात.
दिवाळीत अनेक ऑटो कंपन्या सुद्धा आपल्या वाहनांवर आकर्षित डिस्काउंट ऑफर लाँच करतात. त्यामुळे तर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर मग तर काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरू तुम्ही सहजपणे हजारो रुपयांची बचत करू शकता.
आजकाल अनेक ऑनलाइन पोर्टल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार खरेदीवर एक्स्ट्रा ऑफर देत असतात. या किमती अनेकदा डीलरशिपपेक्षा कमी असतात. म्हणून, कार खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही किमतींची तुलना करणे महत्त्वाचे आहे.
तुमच्याकडे आधीपासून एखादी कार असल्यास, दिवाळीत ती नवीन कारसोबत एक्स्चेंज करणं फायद्याचं ठरू शकते. या काळात कंपन्या जास्त एक्स्चेंज बोनस देतात, ज्यामुळे जुन्या कारला उत्तम किंमत मिळते आणि त्यातून अतिरिक्त बचतही होऊ शकते.
कार खरेदी करणारे बहुतेक ग्राहक कार लोनचा पर्याय निवडतात. दिवाळीत बँका आणि NBFCs खास फायनान्सिंग ऑफर्स आणतात, ज्यामध्ये कमी व्याजदर, शून्य प्रोसेसिंग फी आणि नो-EMI पिरियड अशा सुविधा मिळतात. जर तुम्ही वेगवेगळ्या बँकांचे ऑफर्स तुलना केलीत, तर दीर्घकालीन व्याजदरावर हजारो रुपयांची बचत करू शकता.
ऑफर्स आधीच ठरलेले असले तरी डीलरशी बोलून आणखी फायदे मिळवता येतात. फ्री ॲक्सेसरीज, मोफत इन्शुरन्स, एक्स्टेंडेड वॉरंटी किंवा सर्व्हिसिंग बेनिफिट्स यांसारखे अतिरिक्त लाभ तुम्हाला चर्चेतून मिळू शकतात.
‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स
दिवाळीनंतर वर्ष संपत आलं की डीलर्स जुने मॉडेल्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तुम्हाला 2024 मॉडेलच्या कारवर मोठा डिस्काउंट मिळू शकतो. मॉडेलमध्ये काही बदल नसेल, पण किंमत खूपच कमी होईल.
जर तुम्ही दिवाळीपूर्वी कार बुकिंग केली तर कंपन्या अनेकदा लवकर खरेदीदारांना विशेष डिस्काउंट किंवा भेटवस्तू देतात. यामुळे वेळेवर डिलिव्हरी देखील सुनिश्चित होते. भारतीय ग्राहकांसाठी नवीन कार खरेदी करण्यासाठी दिवाळी हा एक उत्तम काळ मानला जातो.