Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन

शासनाची सर्व संकेतस्थळे ही gov.in या डोमेन नुसार प्राप्त होतात.म्हणून अशाच अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा. तसेच com.online. site.in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वापर करू नये.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2025 | 07:22 PM
एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली 'हे' आवाहन

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली 'हे' आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

पुणे आरटीओकडून नागरिकांना आवाहन
बनावट वेबसाइट्स,अॅप , खोट्या ई-चालान लिंकपासून सावधान
वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रमाण वाढले

पुणे: राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने (RTO) बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान (Crime) लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड करू नये
RTO Services.apk, mParivahan_Update.apk, eChallan Pay.apk अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे. https://echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये.

बनावट वेबसाइट्स,ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा : परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा
वाहन नोंदणीसाठी https://vahan.parivahan.gov.in,
वाहन चालक परवाना सेवेसाठी https://sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवेसाठी https://www.parivahan.gov.in
ई-चलन दंड भरण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in

महत्वाची सूचना
शासनाची सर्व संकेतस्थळे ही gov.in या डोमेन नुसार प्राप्त होतात.म्हणून अशाच अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा. तसेच com.online. site.in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वापर करू नये.

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे चलन बाकी आहे, परवाना सस्पेंड होणार आहे. असे संदेश आरटीओ कार्यालयाकडून कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही. अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न चालू आहे.त्यामुळे नागरिकांनी अशा अनधिकृत वेबसाईट पासून सावधान राहावे.
स्वप्निल भोसले,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे

अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे–सातारा महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दोन भरारी पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मद्यप्राशन तपासणी तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे. नुकतीच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून तपासणीसाठी ठेवलेल्या जागेचा आढावा घेतला. खेड शिवापूर टोलनाक्यावरील ‘वे ब्रिज’जवळ वाहनांना थांबवून तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Beware of fake websites apps fraudulent e challan links rto appeals to citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • crime news
  • E Challan
  • Pune RTO

संबंधित बातम्या

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
1

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप
2

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
3

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
4

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.