फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IBPS Recruitment 2026: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शनने (IBPS) सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी, असिस्टंट ग्रेड बी आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी पदांसाठी ‘आयबीपीएस रिक्रूटमेंट २०२६’ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक उमेदवार २९ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
आयबीपीएस रिक्रूटमेंट २०२६ साठी शैक्षणिक पात्रता ही पदावर अवलंबून असेल. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची आवश्यक पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी साठी उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बीई-बीटेक किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे.
तर असिस्टंट ग्रेड बी साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के एकूण गुणांसह बॅचलर डिग्री, विशेषतः सायन्स, कॉमर्स, स्टॅाटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, आयटी, डेटा ॲनालिटिक्स, बिझनेस एडमिनिस्ट्रेशन किंवा मॅनेजमेंटमध्ये असणे आवश्यक आहे. याशिवाय, या पदासाठी प्रगत एमएस एक्सल स्किल्स देखील आवश्यक आहेत.
प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी साठी फुल टाईम बीएससी आयटी, बीसीए, बीएससी, कॉम्प्युटर सायन्स किंवा त्या समतुल्य पात्रता, तसेच कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमधील इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे अनुभवाची देखील मागणी करण्यात आली आहे.
सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर अर्जदाराकडे किमान ३ वर्षांचा संबंधित अनुभव असावा. तर असिस्टंट आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अर्जदारांकडे किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या,साठी आयबीपीएसची वयोमर्यादा पूर्ण करावी लागेल. वयाची गणना १ ऑक्टोबर २०२६ नुसार केली जाईल. यामध्ये सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी साठी उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे आहे.
तर असिस्टंट ग्रेड बी साठी उमेदवाराचे किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे आहे. तसेच प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी साठी उमेदवाराचे किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
आयबीपीएस रिक्रूटमेंटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क (Application Fee) भरावे लागेल. अर्ज भरताना शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. हे २५० रुपये शुल्क सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असेल. याशिवाय, पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी च्या उमेदवारांचा मूळ पगार दरमहा ३५,४०० रुपये असेल. तर सुरुवातीचा एकूण पगार सुमारे ७३,०२० रुपये असेल, तर अंदाजे सीटीसी (CTC) १४.०९ लाख रुपये असेल. याशिवाय, प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी आणि असिस्टंट ग्रेड बीच्या उमेदवारांसाठी मूळ पगार दरमहा २५,५०० रुपये असेल. तर सुरुवातीचा एकूण पगार सुमारे ५४,२१० रुपये असेल आणि अंदाजे सीटीसी १०.५७ लाख रुपये असेल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड अर्जाची छाननी, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन लिखित परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत याद्वारे केली जाईल. लिखित परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
CBSE Rule Changes: सीबीएसईच्या नियमात ७ महिन्यात तब्बल ६ वेळा बदल; विद्यार्थी आणि पालक संभ्रमात!
1. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वर जावे.
2. आता येथे ‘न्यू रजिस्ट्रेशन’ वर क्लिक करून नोंदणी करावी.
3. त्यानंतर फॉर्ममध्ये लॉगिन करून वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरावा.
4. यानंतर अर्जात मागितलेले आवश्यक कागदपत्रे आणि अंगठ्याचा छाप तसेच हाताने लिहिलेले डिक्लेरेशन अपलोड करावे.
5. आता फायनल सबमिशनपूर्वी सर्व तपशील एकदा नीट तपासून घ्यावा.
6. यानंतर ‘कंप्लीट रजिस्ट्रेशन’वर क्लिक करून २५० रुपयांचे अर्ज शुल्क ऑनलाइन जमा करावे.
7. शेवटी अर्ज सबमिट करा आणि पेमेंटची पावती डाउनलोड करावा.
Ans: इच्छुक उमेदवार १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Ans: सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
Ans: सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी, असिस्टंट ग्रेड बी आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी या पदांसाठी भरती होत आहे.






