Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGauss C12 MaxR: किंमत जास्त वाटतेय? ही 5 फीचर्स बदलतील तुमचा विचार!

₹1.46 लाखांच्या किंमतीत येणारी बीगॉस C12 MaxR केवळ रेंजवर भर देत नाही, तर मोठे स्टोरेज, स्मार्ट TFT डिस्प्ले आणि आरामदायी सस्पेंशनही देते. 178 km ची दावा केलेली रेंज, 38 लिटर जागा आणि आधुनिक फीचर्स पाहता ही स्कूटर नेमकी कोणत्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 07:33 PM
BGauss C12 MaxR: किंमत जास्त वाटतेय? ही 5 फीचर्स बदलतील तुमचा विचार!
Follow Us
Follow Us:
  • बीगॉस C12 MaxR मध्ये 178 km रेंजसोबत 38 लिटरचे मोठे स्टोरेज मिळते, जे दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे.
  • 5 इंच TFT डिस्प्ले, Bluetooth, नेव्हिगेशन आणि वायरलेस चार्जिंगमुळे स्कूटरला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते.
  • अॅडजस्टेबल सस्पेंशन, डिस्क ब्रेक आणि 160 mm ग्राउंड क्लीयरन्समुळे भारतीय रस्त्यांसाठी चांगली क्षमता मिळते.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना ग्राहक आता केवळ रेंजपेक्षा आराम, स्टोरेज, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेलाही महत्त्व देत आहेत. अशा ग्राहकांसाठी बीगॉसने C12 MaxR सादर केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.46 लाख असून, या किमतीत ती प्रीमियम फॅमिली स्कूटर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

178 km रेंज आणि दमदार बॅटरी

C12 MaxR मध्ये 3.8 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पूर्ण चार्जमध्ये स्कूटर 178 km पर्यंत धावू शकते. ही बॅटरी 4.2 kW PMSM मोटरला ऊर्जा देते. रायडिंगसाठी Eco, Ride आणि Sport असे 3 मोड मिळतात. बॅटरी सुमारे 3 तास 50 मिनिटांत 80% आणि जवळपास 5 तास 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी

38 लिटर स्टोरेजची मोठी जागा

दैनंदिन वापरासाठी C12 MaxR चे 38 लिटर अंडरसीट स्टोरेज विशेष फायदेशीर ठरते. यात 2 हेल्मेट ठेवण्याइतकी जागा मिळते. याशिवाय फ्लॅट फ्लोअरबोर्ड, बॉटल होल्डर्स, अंब्रेला होल्डर आणि लॉक करण्यायोग्य ग्लोव्हबॉक्स देण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबासाठी खरेदी, ऑफिस किंवा रोजच्या प्रवासात जास्त सामानाची अडचण कमी होते.

5 इंच TFT आणि स्मार्ट फीचर्स

स्कूटरमध्ये 5 इंच TFT डिस्प्ले असून त्यावर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, Distance-to-Empty आणि कस्टमायझेबल थीम्स पाहता येतात. Bluetooth कनेक्टिव्हिटी आणि वायरलेस चार्जिंगही मिळते. Fall Sense, अँटी-थेफ्ट टेक्नॉलॉजी आणि स्टँडवर मोटर कट-ऑफ यांसारख्या सुरक्षा सुविधा देण्यात आल्या आहेत.

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

प्रीमियम लूक आणि आरामदायी सस्पेंशन

फुल-LED लाइटिंग आणि अलॉय व्हील्समुळे स्कूटरला आधुनिक लूक मिळतो. पुढे हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन, तर मागे 5-स्टेप अॅडजस्टेबल Nitrox गॅस-चार्ज्ड सस्पेंशन आहे. त्यामुळे खराब रस्ते आणि वेगवेगळ्या वजनाच्या वापरात आराम ठेवण्यास मदत होते.

ब्रेकिंग आणि ग्राउंड क्लीयरन्स

C12 MaxR मध्ये दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, 12-इंच ट्युबलेस टायर्स आणि 160 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळते. त्यामुळे शहरातील खड्डे, स्पीड ब्रेकर आणि विविध रस्त्यांवर स्कूटर हाताळणे सोपे होऊ शकते. एकूणच, रेंज, मोठे स्टोरेज, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि आरामदायी सेटअप यामुळे C12 MaxR ची ₹1.46 लाख किंमत काही ग्राहकांसाठी योग्य ठरू शकते.

 

Web Title: Bgauss c12 maxr key features price range electric scooter auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

होंडाच्या 4 प्रीमियम पण परवडणाऱ्या बाईक्स याच वर्षी भारतात होणार लॉन्च! आत्ताच घ्या जाणून
1

होंडाच्या 4 प्रीमियम पण परवडणाऱ्या बाईक्स याच वर्षी भारतात होणार लॉन्च! आत्ताच घ्या जाणून

अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!
2

अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच
3

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
4

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.